सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
शेती पंपाच्या रोहित्रात अचानक स्फोट होऊन उडालेल्या भडक्यात शेतातील फुल पत्त्यावर आलेल्या कपाशीचे एक एकर क्षेत्र जळून खाक झाल्याची घटना रात्री निमखेडी ता सोयगाव शिवारात उघडकीस आली आहे दरम्यान रोहित्रात अचानक बिघाड होऊन हा स्फोट झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून रात्री 9 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडल्या ने पुढील अनर्थ टळला आहे.
निमखेडी ता सोयगाव शिवारात उत्तम शिंदे यांच्या शेतात रात्री अचानक रोहित्रात बिघाड होऊन अचानक भला मोठा आवाज झाला या सोबतच भले मोठेआगीचे लोळ आढळून येताच शेतकऱ्याने लांब अंतरावरन पाहिले परंतु तो पर्यंत आवाजात राख रांगोळी झाली होती यामध्ये एक एकर वरील फुल पत्त्यावर आलेल्या कपाशी पिकांना आग लागून फुल पाते,हिरवी पाने जळून खाक झाली होती घटनेच माहिती मिळताच सोमवारी तहसीलदार प्रवीण पांडे यांनी घटनेची पाहणी करून कृषी आणि महावितरणच्या पथकांना पंचनाम्याचे आदेश देताच सोमवारी दुपारी कृषी विभागाच्या पथकाने पंचनामा केला आहे.
रोहित्राच्या झालेल्या स्फोटा च्या आगीत शेतातील वीज पंप जोडणीच्या नळ्या सह ठिबक सिंचन, वीज पंप आदी जळून खाक झाले असून कपाशी पिकांचे एकर भर नुकसान झाले आहे.
घोसला कोरणा सारख्या महामारीत लाईट नसल्याने समस्त गावकरी त्रस्त व घोसला येथील सिंगल फेजच्या डी पी नेऊन ८दिवस झाले तरीही डीपी येण्यास कोणत्याही हालचाली होतना दिसत नाहीत