भाजपा जिल्हाध्यक्ष यांच्या ठेकेदार बंधुचा प्रताप -ग्रामविकास मंत्रालयाने दिलेला ७१ लाख रू निधी रस्ता न करताच हडपला, मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्र्यांना तक्रार – डॉ.गणेश ढवळे
बीड:आठवडा विशेष टीम― मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील इजिमा ११३ ते धुमाळवाडी रस्ता सुधारणा करणे या कामाची एकुण लांबी १.७५० किलोमीटर, कामाची अंदाजित रक्कम ७१.२५ लक्ष रुपये. काम सुरू केल्याचा दि.०७/०३/२०१९ आणि काम पुर्णत्वाचा दि.०२/१२/२०१९ असे फलक या मार्गावर लावलेले आहेत,प्रत्यक्षात मात्र रस्ता न करताच निधी उचलून हडप केला आहे, यामुळे ठेकेदार मदन मस्के व कार्यकारी अभियंता बेदरे यांनी ग्रामस्थांसह ग्रामविकास मंत्रालयाची फसवणूक केली असल्याची भावना धुमाळवाडी करांनी बोलून दाखवली, या प्रकरणी मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, अधिक्षक अभियंता,ग्रामिण रस्ते विकास संस्था विभागीय कार्यालय औरंगाबाद यांना जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत निवेदन दिले आहे.
कार्यकारी अभियंता बेदरे आणि ठेकेदार मस्के यांची संगनमताने शासकीय तिजोरुवर दरोडा
ठेकेदार मदन मस्के यांनी भाळवणी ते बेलेश्वर या १३ कोटी रुपयांच्या रस्त्याची निकृष्ट दर्जाचा रस्ता करून माती केलीच आहे, शासकीय निधीचा मोठ्या प्रमाणावर अपहार केला आहे, परंतु आता धुमाळवाडी या ठिकाणी रस्ता न करताच दि
०७/०३/२०१९ ला काम सुरू आणि दि. ०२/१२/२०१९ ला काम पूर्ण झाल्याचा फलक लाऊन शासकीय तिजोरीवर दरोडाच टाकला आहे.
हा अपहार कार्यकारी अभियंता बेदरे आणि ठेकेदार मदन मस्के यांनी संगनमताने शासनाची फसवणूक केली आहे. या प्रकरणी चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. यासाठी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांना लेखी तक्रार केली आहे.