अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले.यात वृक्षारोपणा सोबतच बुधवार,दिनांक 5 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात 125 जणांनी रक्तदान केले.
शहरात साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त जयंती उत्सव समितीच्या वतीने स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या रक्तपेढी विभागात 1ऑगस्ट ते 5 ऑगस्ट या कालावधीत रक्तपेढीच्या आवश्यकतेनुसार साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या अंबाजोगाई शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी यांनी रक्तदान केले.प्रारंभी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस डॉ.योगेश गालफाडे आणि डॉ.विनय नाळपे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी अविनाश लोंढे,अविनाश साठे,अॅड.शिरीष कांबळे,धनंजय साठे,जयानंद कांबळे,किरण भालेकर,अमोल वाघमारे,चंद्रकांत घोडके,गोविंद जोगदंड,विनोद वैरागे,सुनील उपाडे,अक्षय भुंबे,निखिल पाटोळे आदींची उपस्थिती होती.जन्मशताब्दी वर्षानिमित्त 1 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट या कालावधीत जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करावे असे आवाहन जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात होते.त्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत अंबाजोगाई शहर व तालुक्यातील तब्बल 125 जणांनी स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या रक्तपेढी विभागात रक्तदान करून अभियान यशस्वी केले.अविनाश लोंढे हे 100 वे रक्तदाते ठरले.रक्तदान शिबिरासाठी सहकार्य करणारे स्वारातीच्या रक्तपेढी विभागातील सर्व डॉक्टर,नर्स,कर्मचारी तसेच रक्तदाते यांचे अविनाश साठे यांनी आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने पुढाकार घेण्यात आला.