जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
येथील श्री.बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबाजोगाई पिपल्स को-ऑप बँकेचे संचालक सुरेश मोदी हे होते तर व्यासपीठावर श्री बालाजी शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष भुषण मोदी,संस्थेचे कार्यकारी संचालक संकेत राजकिशोर मोदी,मार्गदर्शक डॉ.विवेकानंद राजमाने,प्रा.सुरेश बिराजदार,प्राचार्य तथा मुख्याध्यापक चंद्रकांत गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रथम इयत्ता 10 वी मध्ये सर्व प्रथम,व्दितीय व तृतीय क्रमांकासह विशेष प्रावीण्य मिळविणा-या विद्यार्थ्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.यावेळी बोलताना प्रा.सुरेश बिराजदार यांनी सर्वप्रथम इयत्ता 11 वी च्या विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबत मार्गदर्शन केले.ते म्हणाले की,10 वी उत्तीर्ण विद्यार्थी तसेच विद्यार्थीनी आणि त्यांचे पालकांनी लक्षात घ्यावे की,बालाजी शिक्षण प्रसारक मंडळात शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागणारे बदल होत आहेत.हे अभिनंदनीय आहे.संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सातत्याने महाराष्ट्रात अंबाजोगाईचे व संस्थेचे नांव उंचावले आहे.पालक व विद्यार्थ्यांना आता पुढील शिक्षणासाठी मुंबई,पुणे,नांदेड किंवा लातूरला जाण्याची गरज नाही कारण,होरायझन अ‍ॅकॅडमी व न्यू व्हिजन पब्लिक स्कुलच्या माध्यमातून मुंबई,पुणे, नांदेड,लातूर येथे मिळणारे दर्जेदार शिक्षण,सोयी-सुविधाआता अंबाजोगाईतच मिळत आहे.त्यामुळे विश्‍वास ठेवा.मुलांना जे हवे ते देण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू,चिंता करू नका.पालकांनी आम्हाला भेटून बोलावे.त्यांच्या पाल्यांना,विद्यार्थ्यांना होरायझन अ‍ॅकॅडमीत तसेच न्यू व्हिजन पब्लिक स्कुलच्या सिबीएसई अकरावी वर्गात प्रवेश दिले जातील असे प्रा.बिराजदार म्हणाले.शाळेचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक सि.व्ही.गायकवाड यांनी आपल्या प्रास्ताविकात मागील 20 वर्षांपासुनचा शाळेच्या इयत्ता 12 वी व इयत्ता 10 वी च्या निकालाबाबतचा दरवर्षी उंचावत जाणारा आलेख व गुणवंत विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशासाठी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकुन पुढील शैक्षणिक कार्याला शुभेच्छा देण्यासाठी दरवर्षी अशा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते अशी माहिती देवून संस्थेचे सचिव राजकिशोर मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक क्षेत्रात ज्ञानदानाचे हे अखंड कार्य चालु असल्याचे विषद केले.याप्रसंगी सुरेश मोदी,संकेत राजकिशोर मोदी,डॉ.विवेकानंद राजमाने यांनी सर्व विद्यार्थी व पालक यांना शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमात शंकर शिनगारे यांनी गायिलेल्या स्वागतगीताने सर्वांचे स्वागत करण्यात आले.तर प्रास्ताविक राजेश कांबळे यांनी करून उपस्थितांचे आभार विनायक मुंजे यांनी मानले.कार्यक्रमास इ.10 वी चे उत्तीर्ण विद्यार्थी,पालक उपस्थित होते.माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी फिजीकल डिस्टन्स पाळून व मास्क वापरून छोटेखानी कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.