सोयगाव:आठवडा विशेष टीम―
सोयगांव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला असून औरंगाबाद जिल्ह्यातील दुर्गम भाग असलेल्या सोयगाव तालुक्यातील आरोग्य अधिकारी यांची रिक्त पदे तातडीने भरा अन्यथा भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मंगळवारी निवेदनाद्वारे देण्यात आला
सोयगांव तालुक्यात १५० पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळलेले आहेत . परंतु तालुक्यामध्अ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह,अनेक पदे रिक्त आहेत . सोयगांव तालुक्यामध्ये मेडीकल ऑफिसरची ७ पदे मंजुर आहेत . त्यापैकी ३ पदे रिक्त आहेत . औषध निर्माण अधिकाऱ्याची ३ पदे रिक्त आहेत . मुख्यालयात N.M. – ३ पदे रिक्त आहे . उपकेंद्र आरोग्य सेविका १२ तर आरोग्य सेवक १२ पदे रिक्त आहेत . तसेच शिपाई व क्लार्कची पदे रिक्त आहेत . त्यामुळे आज रोजी प्रशासनातील अधिकारी कोरोनावर चांगले काम करीत असले तरी रिक्त पदांमुळे मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाली आहे . देव्हारी , ता . सोयगांव येथे सुमारे ५० कोरोना रुग्ण आहे . परंतु सावळदबारा प्राथमिक आरोग्य केंद्रला एकच आरोग्य अधिकारी आहे . त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रावर लक्ष देवून देव्हारी येथे लक्ष द्यावे लागत आहे. त्यामुळे ते रुग्णांना सेवा व्यवस्थित पुरवू शकत नाही त्यामुळे रुग्णांचे अत्यंत हाल होत आहे .
दि २ऑगस्ट रोजी भाजपा प्रदेश चिटणीस इद्रीस मुलतानी यांनी देव्हारी ता सोयगाव भेट दिली व तेथे 50 कोरोना रुग्ण आढळल्यामुळे त्यांना देव्हारी येथेच विलगिकरण केंद्रात ठेवण्यात आले त्यांच्या सुरक्षेसाठी तहसीलदार यांनी रुग्णवाहिका आवश्यक असल्याचे सांगितले लगेचच भारतीय जनता पक्षाच्या वतीने तेथे रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली.
या निवेदनावर भाजपा तालुकाध्यक्ष गणेश लोखंडे,माजी तालुकाध्यक्ष जयप्रकाश चव्हाण, शिवाजी बुढाळ, नगराध्यक्ष कैलास काळे, पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवणे, बद्री राठोड, सुनिल ठोंबरे, मंगेश सोहणी, वसंत बनकर, विनोद टिकारे, शांताराम खराटे, उत्तम चव्हाण, ताराचंद राठोड त्रिंबक शिनगारे, प्रभाकर बंडे,आदींच्या सह्या आहेत