वाघिरा गावातील गावठी दारूचा पर्दाफाश, पाटोदा पोलिसांना छापे मारुन न सापडणारी दारू सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी शोधली
पाटोदा दि.०६:नानासाहेब डिडुळ― पाटोदा तालुक्यातील मौजे वाघिरा या गावात अवैध गावठी दारूच्या वाढत्या प्रमाणामुळे पुरूष व लहान मुले व्यसनापायी बरबाद होताना पाहुन महिलांनी दि. १४/०७/२०२० रोजी पाटोदा पोलिस ठाणे येथील स.पो.नि. सिद्धार्थ माने यांना लेखी निवेदन दिले,त्यांनी छापा टाकला परंतु दारु सापडली नाही.त्यानंतर दारु विक्रेत्यांचा महिलांना त्रास वाढला, शिविगाळ करणे, धमकी देणे, आदि.प्रकार वाढल्यामुळे व दारूबंदी न झाल्याने दि. १७/०७/२०२० रोजी बीड येथे जाऊन पोलिस अधीक्षक बीड व दारूबंदी शाखा यांना लेखी तक्रार दाखल केली. त्यानंतर दारुबंदी शाखा बीड यांनी छापा टाकला परंतु त्यांना दारू सापडली नाही.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=313138613135624&id=100033184637265?sfnsn=wiwspwa&extid=FVk4djNJQSGWWRn5&d=w&vh=i
पोलिसच घरभेदी, ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच,महिलांचा आरोप―
वाघिरा ग्रामपंचायत उपसरपंच, सदस्य यांनी पोलिस प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांची छुपीयूती आहे, छापा टाकायला येण्यापूर्वीच दारूविक्रेत्यांना मोबाईल फोन वरून कल्पना दिली जाते.त्यामुळे छापा टाकल्यानंतर मूद्देमाल सापडत नाही, व महिलांना दारू विक्रेत्यांनी त्रास देण्याचे प्रमाण वाढले आहे.
पोलिसांना न सापडणारी दारू शोधली, महिलांना शिविगाळ व धमक्या वाढलेल्या, गुन्हे दाखल करण्यासाठी रास्तारोको ― डॉ.गणेश ढवळे
दारूविक्रेते यांच्याकडुन महिलांना अर्वाच्च शिवीगाळ व मानसिक ताण तसेच धमकीचे प्रकार वाढल्याने पाटोदा पोलिस ठाणे येथील स.पो.नि. सिद्धार्थ माने यांना तक्रार केली असता ५-६ वेळा छापा टाकला परंतु दारू आढळुन आली नाही,व त्यांच्यावर कारवाई केली आहे,असे सांगितले त्यानंतर आज दि. ०६/०८/२०२० वार गुरुवार रोजी सकाळी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी स्वत: वाघिरा शिवारातील डोंगरदऱ्यात जाऊन दारू निर्मिती करणाऱ्या दत्ता काळे यांचे दोन बरल दारुंचे चित्रिकरण व छायाचित्र प्रसारमाध्यमात पाठवले. त्यामुळे आज सकाळी पुन्हा दत्ता काळे यांनी मनिषा भागवत जोगदंड व भागवत जोगदंड यांनी दारूबंदीसाठी लेखी तक्रार दाखल केल्यामुळे व डॉ.गणेश ढवळे यांना कल्पना दिल्यामुळे अर्वाच्च शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आज पाटोदा पोलिस ठाणे येथे जाऊन सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी संबंधित दारु निर्माते,व विक्रेते यांच्यावर कोव्हीड-१९ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत.तसेच मनिषा भागवत जोगदंड व भागवत जोगदंड यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देणा-या दत्ता काळे व इतरांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी लेखी मागणी करत दि. १० ऑगस्ट रोजी वाघिरा फाटा येथे मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन दिले आहे.