सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
निंबायती ता सोयगाव येथील आदिवासी ग्रामस्थांना अजूनही ऐन कोरोना काळात स्वच्छतेची प्रतीक्षा लागली असून संबंधित ग्रामपंचायत मात्र गावाच्या स्वच्छतेच्या दुजाभाव करत असल्याचा आरोप आदिवासींनी केला आहे.
कोरोना संकट काळातही निंबायती गाव अस्वच्छतेच्या दारात आहे या गावात आदिवासी वस्ती आहे या ग्रामस्थांना आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेची प्रतीक्षा असून मात्र संबंदहित ग्रामपंचायत दुर्लक्ष करून ग्रामसेवक व सरपंच या गावबाबत दुजाभाव करत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे नुकत्याच झालेल्या पावसाने गावातील रस्त्यावर चिखल,झाला आहे त्यातच पाण्याचे डबके साचले आहे यावर वाढत्या डासांचा प्रादुर्भाव होऊन आदिवासींच्या आरोग्य धोक्यात आहे याबाबत अनेकदा ग्रामसेवक यांना याबाबत माहिती देऊनही दुयलक्ष केल्या जात आहे गावात अल्पसंख्याक निधीतून रस्ता मंजूर झालेला आहे या रस्त्याचा निधी ग्रामपंचायत च्या खात्यावर वर्ग झालेला असुम अद्याप रस्त्याचे काम पूर्ण नसून हा निधी कागदावरच खर्च झाल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य शमा तडवी यांनी केला आहे.