बीड:आठवडा विशेष टीम―
वडवणी तालुक्यातील असं की या मागासवर्गीय बांधवांनी रमाई घरकुल योजनेसाठी सन 2019/20 साठी अर्ज दाखल केले होते परंतु पंचायत समिती आणि पंचायत समिती अंतर्गत वादामुळे याठिकाणी मागासवर्गीय रमाई घरकुल योजनेसाठी अर्ज दाखल केलेल्या मागासवर्गीय समाज बांधवांना येथील पंचायत समिती सभापती व पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांमुळे अखेर निराश होण्याची प्रक्रिया झालेली आहे गेल्या काही दिवसापूर्वी बीड जिल्ह्याच्या नशिबात सामाजिक व न्याय विभाग मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या स्वाधीन केलेला आहे परंतु त्यांच्या जिल्ह्यातील यात वडवणी तालुका हा रमाई घरकुल योजने पासून वंचित राहिला असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे धनगर समाज संघर्ष समिती बीड जिल्हा प्रमुख दत्ता वाकसे यांनी म्हटले आहे पुढे ते म्हणाले की सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यामध्ये विशेषता डोंगरपट्ट्याच्या बालाघाट मध्ये असलेला प्रबल वडवणी तालुक्यामध्ये मागासवर्गीय समाज बांधवांना अखेर निराश व्हावे लागले आहे पंचायत समितीकडे मागासवर्गीय समाजबांधवांनी रमाई घरकुल योजनेसाठी अर्ज दाखल करूनही पंचायत समितीच्या अंतर्गत वादामुळे याठिकाणी असलेल्या मागासवर्गीय समाज बांधवांना या योजनेपासून वंचित रहावे लागले असले तरी या जिल्ह्यांमध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मात्र याकडे कानाडोळा केल्याचे बोलले जात आहे परंतु या प्रश्न सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी तालुक्याच्या मागासवर्गीय समाज बांधवांसाठी विशेषता लक्ष घालून त्यांच्या असलेल्या घरकुल योजनेला न्याय मिळवून दिला तर नक्कीच मागासवर्गीय समाज बांधव हा धनंजय मुंडे यांना अतिशय चांगल्या पद्धतीने माणला जाईल असे देखिल या प्रसिद्धीपत्रकाद्वारे धनगर समाज संघर्ष समिती बीड जिल्हा प्रमुख दत्ता वाकसे यांनी म्हटले आहे.