सोयगाव: पुराच्या प्रवाहात वाहिलेल्या बैलाचा मृतदेह मिळाला ,महसुलकडून पंचनामा

जरंडी:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
मंगळवारी दुपारी अचानक झालेल्या जोराच्या पावसात निंबायतीच्या सुकी नदीच्या पुरात अडकलेला बैल वाहत जाऊन बुधवारी सायंकाळी निंबायती फाटा नजीक पुलाजवळ मृतदेह आढळला या प्रकरणी महसूल विभागाने पंचनामा केला आहे
निंबायती येथील शेतकरी शेख तोसिफ,हे त्यांच्या शेतात असतांना शेतातील बैल धिंगापूर शिवारकडे चरत भरकटुन गेला होता परंतु दुपारी अचानक जरंडी भागात जोरदार पावसाने हजेरि लावल्याने धिंगापूर शिवारातून उगम पावलेल्या सुकी नदीच्या पात्राला मोठा पूर आला होता हा अडकलेला बैल पुरा च्या प्रवाहातून घरी जाण्यासाठी प्रयत्न करत असतांना तोल जाऊन प्रवाहात वाहून गेला त्याचा मृतदेह तब्बल 24 तासांनी सुकी नदीच्या पाच की मी अंतरावर पुलाजवळ बुधवारी मृतावस्थेत आढळून आला आहे या प्रकरणी शेतकरी शेख तोसिफ यांनी महसूल विभागाच्या दिलेल्या माहितीवरून घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे याबाबत संबंधित शेतकऱ्याचा नुकसानभरपाई बाबतची कारवाई पाठवून दिले असल्याचे तहसीलदार प्रवीण पांडे यांनी सांगितले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.