सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
डोक्यावरील कर्जाचा डोंगर आणि यंदाच्या हंगामातील येणारी तूट यामुळे विवंचनेत अडकलेल्या दोन तरुण शेतकऱ्यांनी शनिवारी शेतातच विषारी औषध प्राशन करून मृत्यूला कवटाळलयाची घटना उघड झाली आहे या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी सोयगाव तालुका हादरला आहे.
तिडका ता सोयगाव आणि घोसला ता सोयगाव या दोन गावातील तरुण शेतकऱ्यांनी शनिवारी शेतात जाऊन पिकांतच विषारी औषध प्राशन करून जीवन संपविले आहे या घटनेत तिडका ता सोयगाव येथील तरुण शेतकरी किरण गायकवाड(वय 28) यांचेवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असतांना,त्याच्याकडे सहा एकर शेती जमीन आहे तिडका ता सोयगाव शिवारात कपाशी लागवड करून तयार केलेल्या शेतातील हंगाम सततचा झालेला पाऊस आणि आताची उघडीप यामुळे कापूस पिके संकटात दिसत असतांना त्याचेकडे असलेले विविध खासगी बँकांचे पाच लाखाच्या जवळपास कर्ज आणि कुटुंबाचा चरितार्थ चालविण्याच्या विविंचनेत त्याने कर्जाच्या डोंगराचा विचार करून या शेतकऱ्याने शेतात च विषारी औषध प्राशन केले घोसला ता सोयगाव शिवारात दीपक रामा शिंदे(वय 30) असे आत्महत्या केलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव आहे दीपक शिंदे हा घरातील कर्ता असून शेताच्या पेरणी पासून ते उत्पन्न पर्यंत यंदाचा खर्चही परवडेनासे झाला असल्याच्या विविंचनेतून दीपक शिंदे याने घोसला शिवारातील शेतात विषारी औषध प्राशन केले यामध्ये त्याचा शेतात पाय घसरून मृत्यू झाला आहे त्याचेकडे दोन लाख रु विविध बँकांचे कर्ज आहे हे फेडण्याच्या विवंचनेत त्याने आत्महत्या केली आहे या प्रकरणी दोन्ही घटनेत महसूल प्रशासनाने पंचनामा केला आहे दीपक शिंदे वर पाचोरा तर किरण गायकवाड वर बनोटी ता सोयगाव येथील रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले शोकाकुल वातावरणात रात्री उशिरा दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.