सोयगाव,ता.९:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगाव तालुक्यातील घोसला गावातील गाव वीज पुरवठ्याचे रोहित्रे आठवडाभरापासून जळाली आहे त्यामुळे या गावात चक्क आठवड्यापासून अंधार आहे वीज पुरवठ्या अभावी परिणामी गावातील पीठ गिरण्या बंद असल्याने लागूनच असलेल्या पाचोरा तालुक्यातील गावात ज्वारी,बाजरीच्या दळण आणून भाकरी खावी लागत आहे.
गाव वीज पुरवठ्याचे रोहित्रे जळून आठवडा होऊनही याकडे अद्याप लक्ष दिल्या जात नाही त्यामुळे आठवडाभरापासूम गाव अंधारात आहे त्यामुळे सायंकाळी सहा वाजेनंतर या गावाच्या सर्वच विधी बंद कराव्या लागत आहे दरम्यान वीज पुरवठ्याभावी गावात गिरण्या बंद आहे त्यामुळे भाकरीच्या पिठासाठी जळगाव जिल्ह्यातील पीठ गिरण्यावर जावे लागत असून त्यासाठी कोरोना संसर्गाची जिल्हाबंदीची आडकाठी येत आहे.
गावात अंधाराचे साम्राज्य पसरल्याने भुरट्या चोरांचा उच्छाद होण्याची शक्यता असून गावाचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.