पाचोरा दि.९:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― पाचोरा आरोग्य सेवा रुग्ण हितासाठी ‘रूग्ण हक्क परिषदची’ शाखा पाचोरा येथे सुरू करीत असून आज रविवार ९ ऑगस्ट रोजी हुतात्मा स्मारकं येथे रुग्ण हक्क परिषदचे जिल्हाध्यक्ष जयेंद्र मोरे सदस्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित ,करण्यात होती ही बैठक रुग्ण हक्क परिषदेने आखून दिलेल्या नियमानुसार कामकाज कसे करावे आणि वेळोवेळी रुग्णासाठी काम कसे करावा गोरगरिब रुग्णासाठी त्याच्या हिताचे निर्णय घेऊन हॉस्पिटलमध्ये डॉक्टराना कसे सहकार्य करून गोरगरिबांना कसा उपचार मिळवता येईल शासकिय हॉस्पिटलमध्ये व रुग्णांच्या गरजा पाहून.आरोग्य विभागाच्या “रुग्ण कल्याण समितीकडून पेशंटसाठी औषध खरेदी, बाहेरून करण्यात येणाऱ्या प्रयोगशाळा तपासणी खर्च, अत्यावश्यक पेशंटसाठी संदर्भसेवा, माता व बाळासाठी कपडे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बसण्याची व्यवस्था या गोष्टी मागण्या परिषदने पूर्ण करणे अपेक्षित आहे. यासाठी आज ही बैठक घेऊन त्याचे नियोजन करण्यात आले,यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि प्रत्येक नागरिकाला रुग्णसेवा मिळावी या बाबत बैठकीत चर्चा करण्यात आली या आदी आज ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त क्रांती दिवस साजरा करण्यात आला आणि गोरगरीबाच्या आरोग्य सेवे साठी आरोग्यसेवक म्हणून काम करण्यासाठी रुग्ण हक्क परिषद तयार करून क्रांतीकार्य कामाची सुरुवात या बैठकीत सुरुवात केली .या बैठकीत मार्गदर्शना करण्यासाठी रुग्ण हक्क परिषचे जिल्हाप्रमुख जयेंद्र मोरे जळगाव .व जनता प्रबोधन बहुद्देशीय संस्थांचे अध्यक्ष गणेश शिंदे होते. या गणेश पाटील बैठकीत सोशल डिस्टन पालन करण्यात आले .या वेळी सचिन पाटील सोमेश पाटील अमजद खान सगीर शेख समाधान जाधव सागर सोनवणे समाधान भोई विशाल परदेशी मुकेश तुपे रामचंद्र जाधव ज्ञानेश्वर महाजन अनिल भोई रवी ठाकूर पपू जाधव गोकुळ पाटील यांच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थितीत होते.