‘घर घर शाळा शिक्षण आपल्या दारी’ ; कुंझरकरांचा स्तुत्य उपक्रम

जळगाव/एरंडोल दि.१०:आठवडा विशेष टीम― कोव्हिड 19 कोरोणाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात सर्वत्र यंदा सन 2020/21शैक्षणिक वर्षे राज्यशासन व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आले. राज्यात सर्वत्र ऑनलाईन पद्धतीने शिक्षण शालेय शिक्षण विभाग व राज्यातील सर्व शिक्षक देत असून विद्यार्थी ऑनलाईन धडे गिरवीत आहेत. ऑनलाइन शिक्षणा ला काही भागात अडसर निर्माण होत आहे.मोबाईल संख्यांची पालकांकडे ग्रामीण भागात आदिवासी वाडी-वस्तीवर कमतरता जाणवत आहे . मात्र या अडचणीवर येथून जवळच असलेल्या आदिवासी वस्तीवर प्रयोग शील शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांनी “घरघर शाळा शिक्षण आपल्या दारी” हा उपक्रम राबवून मात केली आहे.यापूर्वी स्वतःच्या दोन्ही मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत च दाखल करून राज्यात सर्वप्रथम जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यमाची रुजवात करणारे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील शिक्षक किशोर पाटील कुंझरकर सध्या आदिवासी वस्ती वरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिल्ल वस्ती गालापुर या शाळेत कोरोना काळात घर घर शाळा शिक्षण आपल्या दारी उपक्रम हाती घेतला आहे. .त्यांनी घरघर शाळा शिक्षण आपल्या दारी हा अनोखा प्रयोग स्वतः वैयक्तिक आनंद उपक्रम म्हणून सुरू केला असून प्रत्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती पालक यांच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या दारातच शाळा आणि शिक्षण नेल आहे. सोशल डिस्टंसिंग चे सर्व नियम पाळत चक्क प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या दारातच शिक्षणाचा यज्ञ मांडत जुन पासून “घर घर शाळा शिक्षण आपल्या दारी”हा अनोखा उपक्रम त्यांनी सुरू केला असून राज्यात सर्वत्र शिक्षण यज्ञ सर्वांनीच आपापल्या पातळीवर पुढाकार घेऊन नवनवीन प्रयोग राबवत असल्याचे पाहून सर्वांपासून प्रेरणा घेत सतत शिक्षण व सामाजिक क्षेत्रात नवनवीन प्रयोग राबवून काहीना काही चांगले करण्याचा व सर्वांना मदत करण्याचा स्वभाव व धडपड असणारे उपक्रमशील शिक्षक तथा आदिवासी वस्ती शाळेचे मुख्याध्यापक किशोर पाटील कुं झरकर यांनी आदिवासी वस्तीवर केवळ सुरेश भील या एकच पालकाकडे अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध असल्याचे पाहिले. ही बाब त्यांना खटकली. एकाच मोबाईलवर सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण होणार नाही हे लक्षात घेऊन स्वतः प्रत्येक विद्यार्थ्यांच्या दारी जाऊन जमेल त्या परिस्थितीत विद्यार्थ्याच्या अंगणात त्यांना शिकवणे सुरू केले व शिक्षणात खंड पडू दिला नाही . त्यामुळे शाळा विद्यार्थी व पालक यांचे नाते घट्ट झाल.. आदिवासी वस्तीवर किशोर पाटील कुंझरकर यांनी प्राप्त परिस्थितीत सोशल डिस्टंसिंग चे सर्व नियम पाळून आदिवासी वस्तीवर शिक्षण सुरू ठेवत घर घर शाळा शिक्षण आपल्या दारी उपक्रम , वस्ती मित्र, पालक मित्र,यातून शिक्षणाचा यज्ञ सुरू ठेवल्याने आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे असे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश भील, सुनील भील, सुभाष भील, काळू पवार आदींनी म्हटले.राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळावे आव्हानात्मक काळात शिक्षण सुरू राहावे यासाठी राज्यातील सर्वच शिक्षक आपापल्यापरीने पुढाकार घेतआहेत कोरोणाशी लढतांना केंद्र व राज्य शासन डॉक्टर्स नर्सेस पोलीस शिक्षक, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी,स्वयंसेवी संस्था ,पत्रकार,सर्वच घटक लढताना पुढाकार असून आपणही काही करावे असे मनोमन वाटायचे. जीवनातील सर्व समस्यांचे मुळ उत्तर शिक्षणच हे असून जीवनात ज्यांच्या पुर्वजांनी कधी शाळेची दार पाहिली नाहीत अशांसाठी काहीतरी करावे असे मला सतत मनापासून वाटते म्हणून माझ्या स्वतःच्या आनंदासाठी समाधानासाठी मी हा उपक्रम कोरोना कठीण काळही आपल्याला खुप खुप काही शिकवतो हे यातून मला अनुभवायला मिळाले . पालक व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद तसेच सर्व माध्यम सर्व घटक व प्रशासकीय अधिकारी ,पालक, पंचायतसमिती, ग्राम पंचायत, शाळा व्यवस्थापन समिती सहकारी, मित्र परिवार, पत्रकार बांधव,सर्व शिक्षक संघटना,माध्यम करीत असलेल्या मार्गदर्शनातून उत्साह वाढत असल्याचे संपर्क साधला असता किशोर पाटील कुंझरकर यांनी म्हटले. जीवन हे सुंदर असून प्रत्येकाने प्रत्येकाला पुढे जाण्यासाठी मदत करणे यातच खरा आनंद असल्याचे त्यांनी म्हटले. गोरगरीब लेकरांचा विकासाचा ध्यास आणि शिक्षण शास्वत आनंद देणारे माध्यम असून राज्य शासन आणि केंद्र शासन शिक्षणासाठी करीत असलेले नियोजन प्रेरणादायी असल्याचे त्यांनी म्हटले. सदरील उपक्रमाचे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार वर्षाताई गायकवाड यांनी मनस्वी अभिनंदन केले आहे. जिल्हा परिषदेचे, पंचायत समितीचे सर्वअधिकारी पदा धिकरी तसेच शिक्षण अधिकारी बी. एस .अकलाडे, महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग संघटना राज्य समन्वय समितीचे राज्य अध्यक्ष अर्जुन साळवे सर्व पदाधिकारी, बालाजी जाधव, विश्वास पाटील,अरुण जाधव, मधुकर घायदार, विजय पवार, शाहू भारती,आदीसह शिक्षण विभाग संचालक डॉक्टर दिनकर पाटील, सह संचालक डॉक्टर दिनकर टेमकर,आदींनी अभिनंदन केले फोटो ओळी ” घरघर शाळा शिक्षण आपल्या दारी”उपक्रम राबवून प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या दारात जाऊन अध्यापनाचे धडे देताना उपक्रमशील शिक्षक किशोर पाटील कुंझरकर.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.