सेवा मंडळाच्या नुतन पदाधिका-यांचा अंबाजोगाईत सत्कार
अंबाजोगाई (प्रतिनिधी): येथील सचिन विलासराव जाधव यांची महाराष्ट्र राज्य परिट (धोबी) सेवा मंडळाच्या बीड जिल्हा युवक अध्यक्षपदी रविवार,दि.9 ऑगस्ट रोजी नियुक्ती करण्यात आली.त्यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत होत आहे.सेवा मंडळाच्या नुतन पदाधिका-यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.अंबाजोगाई येथील युवा कार्यकर्ते सचिन विलासराव जाधव यांनी गेल्या काही वर्षांत केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेवून त्यांची नियुक्ती सेवा मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाजीराव शिंदे,प्रदेश अध्यक्ष विवेक ठाकरे,युवक प्रदेशाध्यक्ष संजय वाल्हे,मराठवाडा विभागीय युवक अध्यक्ष अॅड.सुधीर जाधव यांच्या शिफारशीवरून करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्य परिट (धोबी) सेवा मंडळ हे राष्ट्रीय पातळीवर कार्यरत संघटन आहे.सचिन विलासराव जाधव हे सध्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या केज विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत.ते बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.नियुक्तीपत्रात नमुद केले आहे की,सामाजिक कार्य करणा-या कोणत्याही संघटनेत युवक हा संघटनेचा खुप मोठा आधार असतो.युवक हा समाजविकासाचा शिलेदार होवून युवकांच्या विधायक शक्तीतुन वर्तमान व भविष्य आशा दोन पिढ्या सामाजिक कार्यात तयार होत असतात.महाराष्ट्र राज्य परिट (धोबी) सेवा मंडळाचे संस्थापक बालाजीराव शिंदे यांनी परिट (धोबी) समाजाच्या क्रांतीकारी लढाईत युवक मंडळ ही स्वतंत्र फळी संघटनेत प्रारंभापासुनच करून ठेवलेली आहे.साहेबांच्या उदात्त कल्पनेतुन कार्यरत महाराष्ट्र राज्य परिट (धोबी) युवक मंडळाचे बीड जिल्हा युवक जिल्हाध्यक्षपदी आपली नियुक्ती करण्यात येत आहे.संघटनेचे प्रखर व अत्यंत क्रियाशिल नेते तथा नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष विवेक ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेश युवक अध्यक्ष संजय वाल्हे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील स्थानिक ज्येष्ठ नेते व संघटनेचे पदाधिकारी यांच्या अनुमतीने आपण विभागात समाजातील युवकांना एकत्र करून सामाजिक परिवर्तनाच्या धोबी समाजाच्या न्याय लढ्यात मराठवाडा विभागाचे योगदान देण्यासाठी उचित कार्य करावे.आपण महाराष्ट्र राज्य परिट (धोबी) सेवा मंडळाची पताका आणखी तेजस्वीपणे उंचीवर नेण्यासाठी कटिबध्द राहावे या अपेक्षांसह पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.तर यावेळी सेवा मंडळाच्या नुतन पदाधिका-यांचा सत्कार ही करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलासराव जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणुन अॅड.सुधीर जाधव,बीड तालुकाध्यक्ष मंगेश घोडके,जिल्हा उपाध्यक्ष जिजा शिंदे, जिल्हासचिव प्रविण साळुंके,तालुका सचिव अतुल साळुंके,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख विजय जाधव,युवक जिल्हाध्यक्ष सचिन जाधव यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी अंबाजोगाई तालुकाध्यक्ष बाबासाहेब जाधव,शिवाजीबापू जाधव,गुलाबराव जाधव,अरूण जाधव,जगन्नाथ जाधव,सुरेश जाधव,अर्जुन जाधव,धनंजय जाधव,योगेश जाधव,अभिजीत पवार,रविंद्र रोकडे, बालासाहेब लोखंडे, शशिकांत दळवे,दिपक जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुञसंचलन संजय जाधव यांनी करून उपस्थितांचे आभार बाळकृष्ण पवार यांनी मानले.सचिन जाधव यांची महाराष्ट्र राज्य परिट (धोबी) सेवा मंडळाच्या बीड जिल्हा युवक अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे नगरसेवक मनोज लखेरा,नगरसेवक महादेव आदमाने, नगरसेवक धम्मानंद सरवदे,माणिकराव वडवणकर,माजी नगरसेवक खालेद चाऊस,दत्तात्रय दमकोंडवार,भारत जोगदंड,रोहन कुरे,प्रताप देवकर,नितीन जाधव,सचिन काशिद,अमोल मिसाळ यांच्यासह इतरांनी अभिनंदन केले आहे.