सोयगाव:दि.११:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
कोविड-१९ च्या अनुषंगाने सोयगाव तालुक्यात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी दिल्या जाणार नाही त्यासाठी गणेश भक्तांनी घरातच गणेशोत्सव साजरा करावा,बैल पोळा सणही घरीच बैलांची पुंजा करून बैलपोळा साजरा करावा शासनाच्या निर्देशानुसार आगामी सण,उत्सव साजरा करण्यासाठी प्रशासनाला व पोलिसांना सहकार्य करण्याच्या स्पष्ट सूचना मंगळवारी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी सोयगावला दिल्या.
सोयगावला तालुकास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी सोयगाव तालुक्यात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी व मिरवणूक साठी कोणत्याही परवानगी देण्यात येणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.त्यासाठी घरगुती गणेशोत्सव साजरा करावा सार्वजनिक मंडळांनी काळजी घेवूनच गणेशोत्सव साजरा करावा अन्यथा कायद्याचा बडगा उगारावा लागेल अशा कडक सूचना त्यांनी बैठकीत दिउल्या आहे.बैठकीसाठी नगराध्यक्ष कैलास काळे,तहसीलदार प्रवीण पांडे,पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ,गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे,आदींसह शहरातील प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती,विकास लोखंडे यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले.उपनिरीक्षक युवराज शिंदे यांनी आभार मानले.यावेळी पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी शासनाच्या सन उत्सव साजरा करण्याबाबतच्या नियमावली समजावून सांगितल्या.