वारकरी सांप्रदायात काम करणाऱ्या लोकांना सरकारने आर्थिक मदत करावी – भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी यांची मागणी

Last Updated by संपादक

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
समस्त मानवी जिवावर उठलेल्या कोरोना संकटात राज्य सरकारने साधी एक दमडी,रूपया,कुणाला मदत केली नाही.मात्र जो वारकरी सांप्रदाय हा महाराष्ट्राचा आत्मा आहे.त्या सांप्रदायात सध्या किर्तनकार, मृदंगाचार्य,गायनाचार्य विणेकरी तथा गांव पातळीवरचे भजनी मंडळ आर्थीक संकटात सापडले असून त्यांना सरकारने तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी भाजपा राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली असून पांडूरंगाच्या पुजेचा मान असणा-या मुख्यमंत्र्यांनी पांडुरंगाच्या लेकराकडे ही लक्ष द्यावे असे त्यांनी म्हटले आहे.

प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात राम कुलकर्णी यांनी म्हटले आहे की,कोरोना संकटाचा समाजातील सर्व व्यवस्थांवर आर्थिक परिणाम झाला.हातावर पोट असलेल्या विविध जाती-धर्माच्या लोकांना तर संकटामुळे उपाशी राहण्याची वेळ आली.तरी पण, महाराष्ट्र सरकारने अद्यापही स्वःता कवडीची आर्थिक मदत राज्यात कुणालाच दिलेली नाही.हे दुर्देव असल्याचे त्यांनी म्हटले आहे.महाराष्ट्र हि संतांची भुमी असून राज्यात वारकरी सांप्रदाय मोठा आहे.किर्तन,भजन,हरिनाम सप्ताहात.भागवत कथा,रामायण,महाभारत,दिंडी,पताकांच्या माध्यमातून फार मोठी उलाढाल सुरू असते.ज्यामधून वारकरी संसार जीवन जगतात.मात्र या संकटामुळे राज्यातील अध्यात्माची दारे आणि विविध मंदिरे बंदच आहेत. किर्तनकारांना किर्तन करता येत नाही.तर त्यावर आधारित इतर सर्व सोपस्कार बंद आहेत.मोठे-मोठे किर्तनकार सध्या आपापल्या घरात आहेत.त्यामुळे सध्या एकूणच वारकरी सांप्रदायाची आर्थिक परवड सुरू आहे.राज्य सरकारने पंढरीचा पांडुरंग जो महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे.त्या पांडुरंग ला डोळ्यांसमोर साक्षी ठेवून,त्याच्या या लेकरांसाठी आर्थिक मदत करावी.ज्याअर्थी पांडुरंगाची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते.त्याअर्थी तेवढ्या अधिकारात वारकरी सांप्रदायाला मदत करण्याचा हक्क आणि अधिकार हा मुख्यमंत्र्यांचाच आहे. तेव्हा राज्याच्या माय-बाप सरकारने वारकरी क्षेत्रातील या लोकांना तात्काळ आर्थिक मदत करावी. अशा प्रकारची मागणी भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे.जर सरकारने यांना मदत केली नाही.तर पांडुरंगाची ही लेकरं कोरोना संकटात उपाशीपोटीच राहतील हे मात्र नक्की.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.