Last Updated by संपादक
बीड, दि १२:आठवडा विशेष टीम― जिल्ह्यात तीन तालुक्यातील काही प्रतिबंधात्मक कार्यक्षेत्रामध्ये गेल्या १४ दिवसात एकही कोविंड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नसल्याने बीड तालुक्यातील रुबा गल्ली, चौसाळा, आष्टी तालुक्यातील लोणी सय्यद मीर ,पाटोदा तालुक्यातील महेंद्रवाडी या गावामध्ये प्रतिबंध शिथील करण्यात आले असल्याचे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी प्रवीण कुमार धरमकर यांनी दिले आहेत.
या गावांमध्ये १४ दिवसात एकही कोविंड १९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही, असे जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी कळविले आहे.
बीड तालुक्यातील रुबा गल्ली चौसाळा , आष्टी तालुक्यातील लोणी सय्यद मीर, पाटोदा तालुक्यातील महेंद्र वाडी येथे प्रतिबंधात्मक कार्यक्षेत्रामध्ये वरील तालुक्यातील संबंधित गावे असलेला कंटेनमेंट झोन शिथिल करण्यात आला आहे या ठिकाणी परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे , असे आदेश दिले आहेत.
राज्य शासनाने लोक डाऊन कालावधी 31 ऑगस्ट 2020 पर्यंत वाढविला असल्याने त्याअनुषंगाने जिल्ह्यात 31 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 12 पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 (1) (3) लागू करण्यात आले आहेत.