औरंगाबाद जिल्ह्यात ३३५ जण कोरोना पॉझिटिव्ह

जिल्ह्यात 13254 कोरोनामुक्त, 4141 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद, दि.13:आठवडा विशेष टीम― औरंगाबाद जिल्ह्यात आज 256 जणांना (मनपा 81, ग्रामीण 175) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 13254 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 335 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 17967 झाली आहे. आजपर्यंत एकूण 572 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4141 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दुपारनंतर 230 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 69, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 88 आणि ग्रामीण भागात 49 रूग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
*सिटी एंट्री पॉइंट (69)*
ए.एस क्लब (2), बन्सीलाल नगर (1), एकता नगर (4), एन बारा (2), वाळूज (1),चिकलठाणा (2), बिडकीन (4), अन्य (9), एकतुनी (1), सावखेडा (1), एल अँड कंपनी परिसर (6), पाटोदा (2), बिडकीन (1) , नक्षत्रवाडी (3), राम नगर (1), ठाकरे नगर (1), करमाड (1), ब्रिजवाडी (1), सिल्लोड (5), बजाज नगर (2), बाबरा (1), फुलंब्री (3), सावंगी (3), रांजणगाव (3), वैजापूर (1), जोगेश्वरी (1), सिडको (1), कन्नड (2), पडेगाव (1), गंगापूर (2), मिटमिटा (1)
*ग्रामीण (61)*
पिंप्री राजा (1), हरसवाडी (1), रांजणगाव शेणपूजी (1), फुले नगर, गंगापूर (1), जोगेश्वरी, गंगापूर (1), धोंदलगाव, वैजापूर (1), पैठण (1), जळगाव (1), घाणेगाव (1), देवगाव, कन्नड (1), शरणापूर, दादेगाव (1), भारत नगर,सिल्लोड (1), औरंगाबाद (17), फुलंब्री (1), गंगापूर (4), खुलताबाद (1),सिल्लोड (2), वैजापूर (3), पैठण (4), सोयगाव (17)
*मनपा (12)*
टिळक रोड (1), हिमायत बाग परिसर (1), क्रांती नगर (1), जय भारत कॉलनी, चिकलठाणा (1), एन सहा सिडको (2), घाटी परिसर (2), हिमालय मॉल परिसर (1), अन्य (1), भारत नगर (1), समर्थ नगर (1)
*सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू*
घाटीमध्ये शहराच्या छावणी भागातील 65 व 80, नांदर येथील 80, पानवडोद, सिल्लोडमधील 50, आंबेडकर नगर, सिडकोतील 70, समता नगर, सिल्लोडमधील 75 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.