पाटोदा:नानासाहेब डिडुळ―
कोरोनाच्या महामारीच्या काळात इमारत बांधकाम व इतर कामगारांसाठी महाराष्ट्र सरकारने कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून आर्थिक दोन हजाराची मदत केली आहे.परंतु या मदतीला दलाल व अधिकाऱ्यांची किड लागल्याने पत्रकार तथा पेंटर हमीदखान पठाणसह कामगारांनी संताप व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र सरकारने कोरोना महामारीच्या काळात महाराष्ट्रातील इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातील नोंदणी सक्रीय (जिवीत ) बांधकाम कामगारांना कोविड १९ विषाणू प्रादुर्भावच्या कालावधीत २००० हजार रुपयांच्या अर्थसहाय्याचा पहिला हप्ता एप्रिल २०२० मध्ये मंजूर करण्यात केला होता. या निर्णयानुसार जुलै २०२० पर्यंत राज्यात ९१४००० बांधकाम कामगारांच्या नावावर रक्कम जमा करण्यात आली. यासाठी मंडळाने १८३ कोटी खर्च केल्याचे म्हटले. परंतु बीड जिल्ह्यातील ५० टक्के नोंदणीकृत कामगारांच्या खात्यात अद्यापही पैसै जमा झाले नाही. या कामगारांसाठी आलेल्या रकमेला दलाल व अधिकाऱ्यांची किड लागल्याने अनेक लाभार्थी इमारत बांधकाम कामगार एवढा मोठा कालावधी उलटूनही अजूनही शासनाकडून आलेल्या रकमेपासून वंचित आहेत.
महाराष्ट्रातील इमारत व इतर बांधकाम कामगारांसाठी शासनाने पुन्हा नोंदणी सक्रीय (जिवीत) बांधकाम कामगारांना ३००० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात येणार असल्याची घोषणा केली.दहा लाख बांधकाम कामगारांना याचा लाभ मिळणार असुन या अर्थसहाय्य वाटपावर तीनशे कोटी खर्च करण्यात येणार असल्याचे शासनाकडून म्हटले गेले आहे. हे पैसे येतील का ? पुन्हा दलाल व अधिकाऱ्यांची किड लागेल अशी शंका कामगारांमध्ये निर्माण झाली आहे.
इमारत बांधकाम व इतर कामगारांच्या कोविड १९ विषाणू च्या प्रादुर्भाव व लाॅकडाॅऊनमुळे अनेक कामागांराच्या नोंदी झालेल्या आहे पण रिनिव्हल न झाल्यामुळे सरकारने दिलेल्या आर्थिक मदतीपासून दलाल व अधिकाऱ्यांच्या लागलेल्या किडीमुळे वंचित राहत असल्याने उपासमारीची वेळ येत आहे. सरकारने नोंदणी झालेल्या कामगारांचा विचार करावा अशी कामगारांची मागणी असल्याचे म्हटले आहे.
―संतोष तांबे