सोयगाव:दि.१४:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
जिल्ह्यात अडीच वर्षात काम करतांना महसुली कामांच्या बाबतीत सोयगावचा विकास पॅटर्न महत्वपूर्ण ठरला असून या आदिवासी तालुक्यात दुष्काळाच्या नियोजनापासून ते अवकाळी पावूस या पर्यंतचा पूर्ण कामांचा कृती आराखडा अजूनही आठवतोय तहसीलदार प्रवीण पांडे यांनी केलेल्या उल्लेखनीय कामामुळेच सोयगाव पॅटर्न आठवणीत राहील असे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी उद्गार निरोप समारंभांप्रसंगी काढून नव्याने जिल्हाधिकारी पदाचा पदभार घेतलेल्या प्रभारी जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी सोयगावच्या आदिवासी तालुक्याकडे अधिकच लक्ष ठेवून तालुका मजबूत करण्यासाठी हातभार लावावा अशा मार्मिक सूचनाही दिल्या या कार्यक्रमात सोयगावचे तहसीलदार प्रवीण पांडे यांचेवर स्तुतिसुमने ओवाळून जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी राज्यात सोयगाव पॅटर्न प्रमाणेच काम करण्यावर भर देणार असल्याचे सांगितले त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या या उद्गारामुळे सोयगावचे तहसीलदार प्रवीण पांडे जिल्ह्यात चर्चेत आले आहे.