ब्रेकिंग न्युज

विनायक मेटे मराठा समाजामध्ये ‘मराठा समन्वय समिती’ काढून फूट पाडण्याचे पाप करत आहेत – गणेश बजगुडे पाटील

बीड:आठवडा विशेष टीम― जगाच्या इतिहासात नोंद व्हावी असे या महाराष्ट्रात “मराठा क्रांती मोर्चाच्या” माध्यमातून लाखोंचे मोर्चे निघाली, आंदोलने झाली कोपर्डी प्रकरणानंतर महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज “मराठा क्रांती मोर्चा” या एकाच छत्राखाली एकत्रित आलेला असताना मराठा समाजातील काही तरुणांची दिशाभूल करून विनायक मेटे सवयीप्रमाणे “मराठा समन्वय समिती” स्थापन करून समाजामध्ये फूट पाडण्याचे पाप करत आहेत. विनायक मेटे हे समाजाचे नेते नसुन राजकीय पक्ष्याचे पुढारी आहेत व आपल्या राजकीय स्वार्थापोटी समाजाची दिशाभूल करण्याचे काम ते नेहमीच करत आलेले आहेत.
मराठा आरक्षण हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आसुन त्यासाठी आमच्या सारख्या असंख्य समाजबांधवांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली, काठ्या लाठ्या झेलल्या, गुन्हे दाखल झाली, कारावास भोगला, स्व. काकासाहेब शिंदे यांच्यासारख्या मराठा तरुणांना आपला जीव गमवावा लागला. त्यावेळी विनायक मेटे कुठे होते ? किती आंदोलकांना त्यांनी पाठबळ दिले किंवा किती मयत समाज बांधवांच्या कुटुंबीयांना भेटी दिल्या ? आज आरक्षणाची लढाई शेवटच्या टप्प्यात आसुन आजची लढाई ही रस्त्यावर उतरून गोंधळ घालण्याची नसुन न्यायालीन लढाई आहे. ज्यावेळी आरक्षणाची लढाई रस्त्यावर उतरून आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते आंदोलने करत होती त्यावेळी मात्र रस्त्यावर नयेता विनायक मेटे हे सत्तेच्या बाकावर बसत होते. गेली २५ वर्ष विनायक मेटे सत्तेत सहभागी असताना त्यांना जर समाजाची काळजी आसती तर आरक्षणाचा विषय आजपर्यंत रखडला नसता. स्वतःच्या स्वर्थापोटी राज्यात मराठा नेते म्हणून मिरवत असताना मेटेंनी आजपर्यंत आपल्या २५ / ३० वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत किती मराठा समाजाच्या तरुणांना उद्योगधंद्यात किंवा नोकरीस लावले ? किंवा मराठा समाजाच्या बेरोजगार तरुणांसाठी कुठला प्रकल्प उभा केलेला दिसून येत नाही. मेटे हे फक्त स्वतःच्या राजकारणासाठी मराठा समाजाचा सोई नुसार वापर करत आलेले आहेत. चारवर्ष “शिवस्मारक समितीचे” अध्यक्ष असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकांची एक वीट देखील त्यांना रचता आली नाही. उलट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भूमीपुजन केल्या नंतर मेटेनी पुन्हा आरबी समुद्रात जावून स्मारकाचे भूमी पूजन केले त्यावेळी आमच्या एका समाज बांधवाला जीव गमवावा लागला. ज्या कोपर्डी प्रकरणा नंतर मराठा समाज लाखोने उसळला त्या आमच्या कोपर्डीच्या श्रद्धा सुद्रिक बहिणीला आणखी न्याय मिळाला नाही. परवा रोहा येथे कोपर्डीची पुनरावृत्ती झाली त्यावर कोणी बोलायला तयार नाही. कालच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शहीद मराठा समाजबांधवांच्या कुटुंबाला आर्थिक मदत व शासकीय नोकरी देण्याचा निर्णय झाला त्यावर लवकरात लवकर आमालबजावनी व्हावी, आरक्षण आंदोलकांवर झालेले गुन्हे मागे घेतले पाहिजेत, आण्णासाहेब पाटील महामंडळातील कर्जप्रक्रणात बँक कर्मचारी टाळाटाळ करत आहेत. यासारखी अनेक महत्त्वाची विषय समाजाची असताना काहीही नबोलता फक्त “उपसमितीचे हे अध्यक्ष काढा व ते करा” हे कितपत योग्य आहे. शेवटी पळसाला तीनच पाने आसतात व सरकारच्या वतीने कोर्टात बाजू मांडायची आहे व्यक्तिगत नाही. “मराठा आरक्षण व शिवस्मारक” हे भिजत घोंगडे ठेवून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याची मेटेंची ही दुटप्पी भूमिका समाजाच्या लक्षात आलेली आहे त्यामुळे स्वतःच्या स्वार्थासाठी कोणीही समाजाचे नुकसान होईल असे कार्य करू नये नसता मराठा समाज कदापि माफ करणार नाही असे आव्हान शिवक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश बजगुडे पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button