कंत्राटदार मदन मस्के आणि कार्यकारी अभियंता बेदरे यांच्यावर ठाकरे सरकारच्या नविन धोरणानुसार देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा – डॉ.गणेश ढवळे

Last Updated by संपादक

बीड:आठवडा विशेष टीम― कंत्राटदार मदन मस्के यांनी अंदाजपत्रकातील लिंबागणेश ते काटवटेवस्ती ते अंजनवतीते घारगांव रस्ता परस्पर वळवुन ढवळे वस्ती, वाणी वस्ती, नाईगडे वस्ती, घोलप वस्ती यांना रस्त्यापासून वंचित ठेवल्यानंतर करणी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली दि.३ सप्टेंबर २०२० वार गुरूवार रोजी सकाळी १० वाजता लिंबागणेश बसस्थानक येथे मांजरसुबा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

अंजनवती सरपंच सुनिल येडे यांचे ठेकेदार मदन मस्के आणि अभियंता जोगदंड यांच्याशी चर्चेनंतर घुमजाव

अंजनवतीचे सरपंच सुनील येडे यांनी दि. २६ जानेवारी २०२०रोजी घेतलेल्या सर्वसाधारण ग्रामसभेत मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत राज्यमार्ग-५६-लिंबागणेश-काटवटेवस्ती-अंजनवती-घारगांव हा टेंडर प्रमाणे रस्ता असुन रस्त्याच्या पुर्वेस काटवटेवस्ती दर्शविली आहे, मात्र सध्या चालू रस्त्तेकामात पश्चिम बाजूस आहे. त्यामुळे काम बंद पाडले आहे. सुचक काटवटे राजेंद्र व अनुमोदक काटवटे कैलास आहेत. त्यांनी दि. २६/०१/२०२० रोजी पालकमंत्री धनंजय मुंडे,आ.संदिप क्षीरसागर, जिल्हाधिकारी बीड, कार्यकारी अभियंता (सीएमजीएसवाय) यांना निवेदन दिले आहे. दि. १२ मार्च २०२० रोजी लिंबागणेश येथे डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.यावेळी सरपंच सुनिल येडे आंदोलनात सामिल होते, मात्र नंतर ठेकेदार मदन मस्के आणि अभियंता जोगदंड यांच्याशी सल्ला-मसलत केल्यानंतर त्यांची भुमिका बदलली असुन रस्ता वळवला काय एवढेच नव्हे तर जुने पुल तसेच ठेवुन रस्ता काम सुरू आहे, याविषयी त्यांची काहीही तक्रार नाही.

लिंबागणेश सरपंच,उपसरपंचाची लेखी तक्रार, टेंडरप्रमाणेच रस्ता करावा–

दि.२८/०७/२०२० रोजी कार्यकारी अभियंता वाघ तसेच यांना दिलेल्या लेखी तक्रार मध्ये सरपंच आणि उपसरपंच यांनी लिंबागणेश बसस्थानक ते गणपती मंदिर व परिसरातील राज्यमार्ग ५६ लिंबागणेश ते काटवटे वस्ती ते अंजनवती ते घारगांव रस्ता मुळ अंदाजपत्रकाप्रमाणे करण्यात यावा असे लेखी निवेदन दिले आहे.सदरील रस्ता मुळ अंदाजपत्रकाप्रमाणे सिमेंट रस्ता आहे, त्यामध्ये कोणताही बदल होऊ नये, सदरील रस्त्यावर भालचंद्र गणपती मंदिर तिर्थक्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी येणा-या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून सदरील रस्त्याचे काम दर्जेदार व मुळ अंदाजपत्रकाप्रमाणे करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

मुख्यमंत्री यांनी नविन जाहीर धोरणाप्रमाणे निकृष्ट दर्जाचे रस्ताकाम प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा ठेकेदार आणि अभियंता ग्रा.र.वि.सं.बीड यांच्यावर दाखल करण्यात यावा–डॉ गणेश ढवळे

– मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या बीड- वरवटी-भाळवणी-बेलेश्वर रस्ता निकृष्ट दर्जाचा केल्याप्रकरणी तसेच लिंबागणेश ते काटवटेवस्ती ते अंजनवतीते घारगांव रस्ता परस्पर वळवुन ढवळे वस्ती, वाणी वस्ती, नाईगडे वस्ती, घोलप वस्ती यांना रस्त्यापासून वंचित ठेवल्यानंतर करणी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी डॉ.गणेश ढवळें लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि. ३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाई. लिंबागणेश बसस्थानक येथे मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.