मुख्याध्यापक किशोर पाटील कुंझरकर यांच्याकडून स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वखर्चातून विद्यार्थ्यांना मास्क भेट

Last Updated by संपादक

जळगाव:आठवडा विशेष टीम― मुख्याध्यापक किशोर पाटील कुंझरकर यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त आत्मनिर्भर भारत संदेश देत स्वखर्चातून विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन मास्क भेट देऊन अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन सर्वांच्या सहकार्यानेफिजिकल डिस्टन्स सर्व नियम पाळून साजरा केला आहे.
आदिवासी वस्तीवर स्वातंत्र्य दिन साजरा.आज 15/8/2020भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 74 वर्धापन दिनाच्या औचित्याने कोरोणा काळ covid-19 संसर्गाच्या पार्श्वभुमीवर आदरणीय शालेय शिक्षण विभाग आदरणीय जिल्हाधिकारी साहेब आदरणीय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब शिक्षणाधिकारी साहेब यांच्याकडून प्राप्त सूचनेनुसार फिजिकल डिस्टन्स चे सर्व नियम पाळून विद्यार्थी विना केवळ शाळा व्यवस्थापन समितीचे केवळ पाच निमंत्रित सदस्य पालक यांच्या उपस्थितीत मास्क चेहऱ्याला लावून त्याच जोडीने त्यांना सनीटाईज करून सकाळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आदिवासी वस्ती वरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिल्ल वस्ती गालापूर या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश दादा भील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी मुख्याध्यापक या नात्याने किशोर पाटील कुंझ रकर यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व स्पष्ट करतानाच केंद्र शासन, राज्य शासनाच्या वतीने प्राप्त सूचनेनुसार गंदगी मुक्त भारत अभियानाची माहिती देत असतानाच जीवनात स्वच्छतेचे आणि शिक्षणाचे अनमोल महत्व असून आदिवासी बांधवांनी विकासाच्या व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी एकत्रित होऊन शिक्षणाची कास धरावी असे आवाहन केले. “घरघर शाळा शिक्षण आपल्या दारी “हा जो मी उपक्रम राबवत आहे त्यात सर्वांचे सहकार्य लाभत असल्याने त्यांनी सर्वांना धन्यवाद देत आदिवासी वस्ती असल्याने व पालकांचीआर्थिक परिस्थिती बेताची असल्याने हा प्रायोगिक तत्त्वावर कोरोना काळातील परिस्थितीमुळे स्वेच्छेने रवीला जात असल्याचा उपक्रम असल्याचे म्हटले. यावेळी पुढे बोलताना त्यांनी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी मांडलेली आत्मनिर्भर भारताची संकल्पना स्पष्ट केली व सर्वांनी आत्मनिर्भर होण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री नामदार वर्षाताई उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार, गायकवाड ,ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील आमदार चिमणराव पाटील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नामदार रंजनाताई पाटील शिक्षण सभापती रवींद्र भाऊ पाटील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्त डॉक्टर विशाल सोळंकी राज्याच्या शिक्षण सचिव वंदना कृष्णा शैक्षणिक संशोधन परिषद पुणे चे संचालक डॉक्टर दिनकर पाटील, सहसंचालक दिनकर टेमकर, समता विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रभाकर क्षीरसागर आणि राज्य व जिल्हा पातळीवरील सर्व टीम, प्राथमिक विभागाचे संचालक जगताप साहेब जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी बीएस अकला डे साहेब डायट जळगावच्या प्राचार्य डॉक्टर मंजुषा क्षीरसागर व सर्व अधिव्याख्याता,व सर्व अधिकारी गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील , शिक्षण विस्ताराधिकारी विजय पवार,सर्व केंद्रप्रमुख तालुका पंचायत समितीचे सभापती अनिल भाऊ महाजन तसेच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची कोरोना काळामध्ये सर्वांनी सुरक्षिततेचे नियम पाळावे आणि ग्रामीण भागात सध्या covid-19 कोरोणा संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर शाळा जरी बंद असल्या तरी राज्यात सर्वत्र ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने शिक्षण सुरू राहावे अशी भावनाआहे . यासाठी राज्यात सर्वत्र सर्व शिक्षक पुढाकार घेत असून राज्यात सर्वच शिक्षक आपापल्या परीने ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने शिक्षण सुरू ठेवत असून राज्याचे माजी शिक्षण सचिव नंदकुमार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व्हाट्सअप वेध ग्रुप तसेच राज्यात होत असलेले होत असणारे वेगवेगळे वेबिनार शैक्षणिक विचार मंथन देखील यासाठी दिशादर्शक ठरत आहे. ही बाब पाहून राज्यातील 32 शिक्षक संघटनांच्या राज्याध्यक्ष यांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षण संघटना समन्वय समितीचा राज्य समन्वयक या नात्याने आणि आदिवासी वस्ती शाळेचा मुख्याध्यापक म्हणून आदिवासी वस्तीवर घर घर शाळा शिक्षण आपल्या दारी हा उपक्रम राबविण्याची कल्पना माझ्या मनात आली आणि त्याला शाळा व्यवस्थापन समिती , ग्रुप ग्रामपंचायत गालापूर तसेच वरिष्ठांकडून संमती आणि प्रोत्साहन मिळाल्याने आनंद वाटत असल्याचे यावेळी मुख्याध्यापक बालरक्षक किशोर पाटील कुंझरकर यांनी म्हटले.यावेळी त्यांनी राज्याच्या समता विभागाचे कार्य सांगून बालरक्षकाची भूमिका आणि विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी समता विभाग करत असलेले कार्य ही विषद केल.याप्रसंगी सुभाष दादा भिल, सुनील आप्पा भिल ,सखाराम भाऊ सोनवणे ,पितांबर भाऊ , राकेश माळी, सीमाताई सोनवणे,आदी मान्यवर उपस्थित होते. ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम आटोपल्यानंतर प्रत्यक्ष वस्तीत जाऊन मुलांना घरघर शाळा शिक्षण आपल्या दारी या उपक्रमांतर्गत मुख्याध्यापक किशोर पाटील कुंझरकर यांनी फिजिकल डिस्टन चे सर्व नियम पाळत थोडा अभ्यास दिला तसेच कोरोणा काळात विद्यार्थ्यांचे संरक्षण व्हावे या भावनेतून घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना नवीन मास्क स्वखर्चाने मुख्याध्यापक किशोर पाटील कुंझरकर यांनी भेट दिले ..यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश दादा भिल सुनील आप्पा भील सुभाष दादा भील आदींनी बोलताना घरघर शाळा शिक्षण आपल्या दारी यामुळे आमच्याकडे मोबाईल नसल्याने मुलांच्या शिक्षणात अडचण येत होती परंतु जून पासून किशोर सर स्वता प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगणात येऊन खाटेवर त्यांना बसवून घरोघरी शिक्षण देत असल्याने आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान वाटतो आनंद होत असल्याचे सुभाष दादा भिल सुरेश दादा भील सुनील आप्पा भील आदींनी म्हटले. आदिवासी वस्ती वरीलआदिवासी वस्ती वरील मुलांनी शिक्षणाच्या मूळ प्रवाहात यावे पालक विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरील आनंद व स्वतःच्या आनंदासाठी यासाठी निकोप भावनेतून आयुष्यात अजून जे जे करता येईल ते ते शासन प्रशासन लोकप्रतिनिधी सहकारी मित्र परिवार या सर्वांच्या मार्गदर्शनातून चांगले करण्याचा मनोदय असल्याचे यावेळी बोलताना मुख्याध्यापक किशोर पाटील कुंझरकर म्हणाले. किशोर सर प्रत्यक्ष घरी येत असल्याचा व अंगणात शाळा भरत असल्याचा आनंद अभिमान असल्याचे विद्यार्थी व पालकांनी म्हटले.. मुख्याध्यापक या नात्याने स्वखर्चातून विद्यार्थ्यांना सुरक्षितेसाठी मास्टर भेट देत तसेच आत्मनिर्भर भारताचा संदेश देत आदिवासी वस्तीवर स्वातंत्र्यदिन साजरा झाला.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.