सोयगाव: खरीपावर टोळधाडचे आगमन ;पाने कुरतडण्याचे काम

Last Updated by संपादक

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगावसह तालुक्यात पावसाच्या संकटांसोबतच बदलत्या वातावरणाने खरिपाच्या हंगामावर नव्याने टोळधाड सदृश नाकतोडे चे आगमन झालेले असल्याने हि टोळके हिरव्यागार कपाशी पिकांच्या पानांना कुरतडत असल्याने शेतकऱ्यांच्या समोर यंदाच्या हंगामात अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे.या टोळधाड सदृश नाकतोड्यावर शेतकऱ्यांना उपाय योजनांचा मार्ग मिळत नसल्याने गोंधळ उडाला आहे.
सोयगावसह तालुक्यात आठवडाभरापासून ढगाळ वातावरण आणि पावूस सुरु आहे.या बदलत्या वातावरणाने आणि वाढत्या हिरवळीने डोंगर भागातून नाकतोड्याचे टोळके सोयगाव तालुक्याच्या शेती शिवारात धडकले असून यंदाच्याच वर्षात हि किडीचे टोळके आगमन झाले आहे.या रंगीबेरंगी नाकतोड्याचे थेट टोळकेच शेतात हल्ला चढवितात यामुळे पिकांच्या पानांच्या रस शोषण करण्याचे काम या टोळक्या कडून होत असल्याने डेरेदार झालेली पिके मात्र या नाकतोड्याच्या हल्ल्यात कमकुवत होत आहे.त्यामुळे काही भागात कापस्जी पिकांनी पाने कुरतडल्यावर माना टाकल्या आहे.याबाबत मात्र कृषी विभागाचे मौन असून कृषी विभाग याबाबत काहीही बोलायला तयार नसून शेतकऱ्यांना कोणतेही मार्गदर्शन मिळत नाही.कपाशी,सोयाबीन,ज्वारी आणि मका पिकांवर या टोळक्यांचा मोठा प्रादुर्भाव आढळून येत आहे.तुरयावर असलेल्या मका पिकांना पोखरून काढण्याचे काम या टोळक्यकडून करण्यात येत असल्याने मका पिकांना मोठा फटका बसला आहे.त्यामुळे एकीकडे पावूस आणि दुसरीकडे नाकतोड्याचे आगमन शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरली आहे.

उपाय योजनांसाठी कृषी विभाग ठप्प-

यावर उपाय योजनांसाठी तालुका कृषी विभाग मात्र ठप्प असून याबाबत कोणतीही माहिती नसल्याचा भास कृषी विभाग दाखवीत असून मुकाट्याने शेतकऱ्यांना या नाकतोड्यांचा सामना करावा लागत आहे.

शेत मजुरांवरही हल्ले-

या नाकतोड्याच्या टोळक्यकडून शेतात काम करणाऱ्या शेत मजुरांवर हल्ले चढविण्याच्या घटना अलीकडे उघडकीस आलेल्या आहे.त्यामुळे मुगाची तोडणी लांबणीवर गेली असून मुगाच्या शेंगा पोखरण्याच्या कामात हि टोळके गुंतले आहे.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.