सोयगाव:दि.१७:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
कोरोना संसर्गाच्या सावट मध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांचा बैलपोळा सण रद्द करण्यात आला असून शेतकऱ्यांनी घरीच बैलांची पूजा करण्याचे आवाहन तहसीलदार प्रवीण पांडे यांनी केले आहे. मात्र बैलपोळा सण रद्द झाल्याने गाव कुसाच्या वेशी बैलपोळ्या च्या दिवशी शांतच राहणार आहे
सोयगाव तालुक्यात काही गावात पारंपरिक पद्धतीने बैलपोळा साजरा करण्याची परंपरा आहे यापैकी घोसला ता सोयगाव गावात मानाच्या बैलाची परंपरा आहे त्यामुळे घोस ला गावातील ही मानाचा बैलाची परंपरा खंडित होणार आहे त्यामुळे आता केवळ मानाच्या बैलाला घरीच पोळा सणाचा नैवैद्य देऊन बैलपोळा साजरा होणार असल्याचे सोपान दादा गव्हांडे, प्रकाश पाटील,गुंणवत ढमाले,प्रमोद वाघ,ज्ञानेश्वर जुनघरे यांनी सांगितले दरम्यान सोयगाव सह तालुक्यातील गावांमध्ये महसुली कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त रद्द करण्यात आला असून पोलीस केवळ गावाच्या वेशीवर गर्दी होणार नाही यासाठी बंदोबस्तवर राहणार आहे त्यामुळे कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भाव मुळे ग्रामीण भागातील यंदाचा पोळा शुकशुकाट करणारा राहणारा आहे.
खांदे मळणी पावसातच-
वर्षभर राबराबणारी बैलांची पोळा सणाच्या पूर्वसंध्येला खांदे मळणी करण्याची परंपरा आहे यामध्ये तूप लावून बैलांच्या खांद्याला चोळून त्यांची पूजा करण्यात येते व बैलांच्या गोठ्यात रात्रभर दिवा लावण्याची परंपरा आहे सोमवारी सोयगाव तालुक्यात पावसातच खान्देमळणी साजरी करण्यात आली