बीड: ‘या’ गावात पावसामुळे लोक करतायेत थर्माकोल वरून जलवाहतूक ,प्रशासन व राजकारणी याकडे लक्ष देणार का ?

Last Updated by संपादक

शिंदेवस्ती (गारमाळ) ग्रामस्थांची रस्त्यासाठी जिवघेणी कसरत, थर्माकोलवरून वाहतूक, राजकारण्यांचे दुर्लक्ष,ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा – डॉ.गणेश ढवळे

पाटोदा:नानासाहेब डिडुळ― पाटोदा तालुक्यातील मौजे सौताडा ग्रामपंचायत अंतर्गत शिंदवस्ती,(गारमाळा) असुन ५०० लोकसंख्या असलेल्या या वस्तिवरील लहानमुलांबाळांना या थर्माकोलवरून ये-जा करावी लागते, दूधदूभतं, किराणा, दवाखाना सर्वांसाठी एकच जलवाहतूक सुरू आहे. राजकारण्यांना वेळोवेळी सांगुन आंदोलने करून कंटाळलेल्या ग्रामस्थांनी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशारा दिला आहे.

बाळु रघुनाथ शिंदे यांच्या पत्नीचे उपचारास वेळ लागल्यामुळे निधन

बाळु शिंदे यांच्या पत्नीला विषबाधा झाल्यामुळे दवाखान्यात नेण्यास ऊशिर झाल्यामुळे मृत्यू झाला. आ.सुरेश धस जामखेड येथे दवाखान्यात आले होते. याच थरमाकोलवर बसुन रवि विठ्ठल शिंदे यांचा मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला होता, राज्यमंत्री असताना आले होते. त्यांनी २२ लाख रुपये किंमतीचा रस्त्यासाठी निधी दिला. मात्र स्थानिक गुत्तेदाराने रस्ता न करताच घशात घातला.रस्ता केलाच नाही.

शिंदेवस्ती (गारमाळ) या ठिकाणी ४ थी पर्यत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. येथिल शिक्षक वैभव भोसले यांना याच थर्माकोलवरून दररोज ने आण करावी लागते. ५ वी च्या पुढील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी सौताडा येथे थर्माकोलवरूनच जिवघेणा प्रवास करावा लागतो. ―बाळासाहेब आजिनाथ शिंदे , जि.प.प्रा.शा. शिंदेवस्ती (गारमाळ) सहशिक्षक

आ.भिमराव धोंडे म्हणतात घरं विकास,इथं कशाला राहतात― परमेश्वर गणपत शिंदे

५ वर्षांपूर्वी आ.भिमराव धोंडे निवडुन आल्यानंतर वस्ति जळाली होती. तेव्हा आ.भिमराव धोंडे साहेब पाहणी करण्यासाठी आले होते.याच थर्माकोलवर बसून गेले होते, लोकांनी रस्त्याची मागणी केल्यानंतर तुम्ही इथं राहतातच कशाला, इथली जमिन विका आणि दुसरीकडं रहा असा अनाहुत सल्ला दिला.परंतु रस्ता दिलाच नाही.

तारामती/छाया/उषा/इंदुबाई शिंदे―
आमच्या मुलांना सौताडा येथे शाळेत जाण्यासाठी जिवघेणी कसरत करावी लागते, सगळ्यांना याच थर्माकोलवरून जावे लागते. कीराणा, दवाखाना यासाठी अशाप्रकारेच जलवाहतूक करावी लागते.

डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते बीड―

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जलवाहतुकीची व्यवस्था भारतामध्ये करण्याची भाषा केली. परंतु गेल्या २० वर्षांपासून शिंदेवस्ती ( गारमाळ) या ठीकाणचे लहानमुलांसह अबालवृद्ध याच थर्माकोलवरूनच जावे लागते. याप्रसंगी ग्रामस्थांनी वारंवार आंदोलने केली, राजकारणी यांना विनंती करुन झाल्या. परंतु कोणतीही पर्यायी व्यवस्था केली नाही. या ठिकाणी २२ लाख रुपये रस्त्यासाठी निधी दिला तोही स्थानिक नेत्यांनी रस्ता न करताच खाल्ला. या प्रसंगी भविष्यात मोठे आंदोलन डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.