अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
तालुक्यातील वरवटी येथील लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे गोरक्षण शाळेने यावर्षी प्रथमच पर्यावरणपुरक अशा गोमय गणेशमूर्ती तयार केल्या आहेत.यातून पर्यावरण संवर्धन करण्याचा मौलिक संदेश देण्यात आला आहे.अशी माहिती लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे गोरक्षण शाळेचे प्रमुख
अॅड.अशोक बालासाहेब मुंडे यांनी दिली आहे.आज संपुर्ण जगासमोर कोरोना सारखे मोठे संकट उभे टाकले आहे.अशा परिस्थितीत आपण अतिशय साध्या पद्धतीने आपले प्रत्येक सण साजरे करीत आहोत.त्याच प्रमाणे या वर्षी आपण सर्व जण गणेशोत्सव ही अतिशय साधेपणाने आणि शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करीत साजरा करूया.घरच्या घरी कुंडीमध्ये श्रींचे विसर्जन करून पर्यावरण संवर्धन करूया.कारण,मानवी जीवनात आपण नकळत किंवा अजाणतेपणामुळे निसर्गाचा समतोल बिघडविण्याचे काम करतो.या बाबीचा विचार करत राष्ट्रीय कामधेनू आयोग,भारत सरकार यांच्या मार्गदर्शनानुसार काही गोष्टी व गो-सेवा गतीविधी,देवगिरी प्रांत यांच्या विधायक सूचनांप्रमाणे तसेच गो-शाळेतील गायींचे संगोपनासाठी गो-शाळा स्वावलंबी बनणे गरजेचे आहे.देश-देव अन् धर्मासाठी गो-आधारीत विविध जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन करून गो-शाळा स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.याच विचाराला बळ देण्यासाठी पर्यावरणपुरक अशा “गो-मय गणेश मुर्ती” यावर्षी प्रथमच बनविल्या आहेत.ज्यामुळे पर्यावरणाची हानी तसेच जल प्रदूषण ही होणार नाही.तसेच जीव दया ही होईल.गो-मय गणेशमूर्ती सोबत एक कुंडी व वनौषधींचे-बी किंवा भाजीपाल्याचे-बी देण्यात येईल.तरी ज्या गणेश भक्तांना पर्यावरणपुरक “श्री मुर्ती” हवी आहे.त्यांनी अॅड.अशोक बालासाहेब मुंडे,प्रमुख-लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे गोरक्षण शाळा वरवटी,ता.अंबाजोगाई जी बीड,(संपर्क क्रमांक-
9764185272/9284408407 ) येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.