सोयगाव:दि.१९:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगावसह तालुक्यात सततच्या आणि मुसळधार होत असलेल्या पावसाचा परिणाम कपाशी पिकांवर झाला आहे.या अति पावसामुळे आणि सूर्यप्रकाश नसल्याने ढगाळ वातावरणाचा तालुक्यात ८ हजार हेक्टरवरील कपाशी पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढविणारी हा पावूस ठरला आहे.
सोयगाव तालुक्याचे प्रमुख पिक म्हणून ओळखल्या जाणार्या कपाशी पिकांना या अति पावसाचा मोठा फटका बसला असून अति पावसाच्या फटक्यात कपाशी लालसर पडल्या आहे.सोयगाव तालुक्यात कोरडवाहू आणि ठिबक सिंचन वर तब्बल ३२ हजार हेक्टरवर कपाशी पिकांची यंदाच्या हंगामात लागवड करण्यात आली आहे.त्यापैकी पाच हजार हेक्टर कपाशी पिकांचे क्षेत्र पाण्यात बुडाले असून आठ हजार हेक्टरवरील कपाशी पिके लालसर पडली आहे.सोयगाव तालुक्यात सलग अकराव्या दिवशी पावसाचा मुक्काम वाढला असून,या पावसात खरिपाच्या कपाशीसह मका पिकांना मोठा फटका बसला आहे,कपाशी हे सोयगाव तालुक्यात शेतकऱ्यांचे मुख्य पिक आहे.या वर्षाच्या हंगामात शेतकऱ्यांनी कपाशी पिकांवर कोणताही प्रादुर्भाव होवू नये यासाठी मोठी काळजी घेत आंतर मशागतीवर भर दिला त्यासोबतच फवारण्या हाती घेतल्या,परंतु पावसाच्या वाढत्या मुक्कामाने मात्र कपाशी पिकांना नुकसानीच्या वाटेवर आणून ठेवले आहे.
सोयगाव तालुक्यात अकरा दिवसापासून सूर्यप्रकाश गायब झाला आहे.सततचा पावूस आणि सूर्यप्रकाशाअभावी खरिपाच्या पिकांना मोठा धोका निर्माण झालेला आहे.सूर्यप्रकाश नसल्याने ऐन उत्पन्नाच्या कालावधीत खरीपाची पिके संकटात सापडली आहे.यावर उपाय योजनांसाठी मार्गदर्शन मिळत नसल्याने शेताकायांची कोंडी झाली आहे.
——————————
ओला दुष्काळ जाहीर करा-
सोयगाव तालुक्यात वार्षिक सरासरीच्या वर पावसाची सरासरी पार झालेली आहे.त्यामुळे सोयगाव तालुक्यात खरीपाचा हंगाम कचाट्यात सापडला असल्याने शासनाने तातडीने पिकांचे पंचनामे करून ओला दुष्काळ जहरी करण्याची मागणी होत आहे.मात्र शासनाला ओल्या दुष्काळाच्या निकष सापडत नसल्याने ओल्या दुष्काळाच्या निकषात शेतकऱ्यांच्या नुकसानीला तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार सुरु झाला आहे.
सोयगाव तालुक्यात सरासरीच्या आधारे झालेला पावूस अद्यापही जास्तच आहे.यासाठी झालेल्या नुकसानीचा अहवाल तालुका कृषी विभागाला मागविण्यात आला असून या आधारे शासकीय निकष ठरवून पंचनाम्यांचा विचाराधीन आदेश आल्यास पंचनामे करण्यात येतील…
प्रवीण पांडे
तहसीलदार सोयगाव
सोयगाव तालुक्यात झालेल्या पावसाची आकडेवारी आणि गावनिहाय पिकांच्या नुकसानीची माहिती संकलित करण्याच्या कामांनी वेग घेतला आहे.आलेली आकडेवारी जिल्हा प्रशासनाला कळविण्यात येतील व त्यानुसार निर्णय घेण्यात येईल…
अरविंद टाकनखार
तालुका कृषी अधिकारी