सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
आठवडाभराच्या संततधार पावसामुळे जरंडी परिसराला लागून असलेल्या अजिंठ्याच्या डोंगरात हिरवळीत असलेले धबधबे सुद्धा चार दिवसापासून ओव्हरफ्लो झाली आहे.या धबधब्यांचे पाणी वाहत डोंगरभर फिरत आहे.त्यामुळे हिरवळीत धबधबे चकाकण्याची हि पहिली वेळ आहे.
जरंडी ते बनोटी या पट्ट्यात दरम्यान पायथ्याशी अजिंठ्याच्या डोंगररांगा लागून आहे.झालेल्या पावसाने या डोंगररांगांना हिरवा शालू पांघरलेला असतांना मात्र अचानक या डोंगरातील धबधबे सुद्धा ओव्हरफ्लो झाली आहे.त्यामुळे डोंगरातील हिरवळीत धबधब्यांचे पाणी संपूर्ण डोंगरात वाहत जावून सोंदर्य लाभले आहे.चक्क हिरवळीत हि धबधबे चकाकत आहे.