सोयगाव:दि.१९:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
कोरोना संसर्गाच्या कचाट्यात सापडलेल्या एस.टी परिवहन ला अखेरीस गुरुवारपासून मुहूर्त सापडला असून जिल्हा प्रशासनाच्या जिल्हाबंदी उठविण्याच्या निर्णयावरून गुरुवार पासून सोयगाव आगाराच्या पहिल्या दिवशी सात बसेस जिल्ह्याबाहेर रस्त्यावर धावणार असल्याची माहिती आगारप्रमुख हिरालाल ठाकरे यांनी दिली.
मार्च महिन्यापासून कोरोना संसार्गात जिल्ह्यात एस.टी ची सेवा बंद होती,या सेवेला प्रशासनाने जिल्हाबंदीची अट शिथिल केल्याने गुरुवार पासून सोयगाव आगार जिल्ह्याबाहेर धावणार असून पहिल्या दिवशी सोयगाव आगाराच्या सात फेऱ्या जिल्ह्याबाहेर धावणार आहे.यामध्ये जळगाव,पाचोरा,धुळे आणि औरंगाबाद याप्रमाणे बसेस सरू होणार आहे.दोन हजार पाचशे किलोमीटरचा पहिल्या दिवशी जिल्ह्याबाहेर प्रवास सुरु होणार असून त्यासाठी बुधवारी सायंकाळी बसेसच्या स्वछतेची मोहीम सोयगाव आगाराने हाती घेतली आहे.
प्रवासात मास्क आवश्यक-
जिल्ह्याबाहेर एस.टीच्या बसेसेवेला परवानगी दिली असली तरी मात्र प्रवाशांच्या तोंडाला मास्कची आवश्यक अट घालण्यात आली ऑन मास्क असल्याशिवाय प्रवाशांना बसमध्ये प्रवेश दिल्या जाणार नाही.