केज:आठवडा विशेष टीम―
शासन मान्यता प्राप्त व अनुदानास पाञ असणा-या डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती माध्यमिक निवासी आश्रमशाळा (ता.केज,जि.बीड) या शाळेला तात्काळ संच मान्यता व वैयक्तिक मान्यता मिळावी यासह इतर मागण्यांसाठी संस्था चालकाने ऊन-वारा-पाऊस यांची तमा न बाळगता गुरूवार,दिनांक 20 ऑगस्ट पासून राहत्या घरी अमरण उपोषण सुरू केले आहे.
या बाबतची माहिती अशी की,बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या पाथरा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती माध्यमिक निवासी आश्रमशाळा आहे.शासन निर्णय 2010 नुसार संच व वैयक्तिक मान्यता मिळावी,सहाय्यक संचालक समाज कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य,पुणे यांचे 2015 ला शाळेला संच मान्यता व वैयक्तिक मान्यता मिळावी असे पत्र आहे.तसेच यासह 165 शाळेला सामाजिक न्याय संचालनालय,पुणे यांनी 2 जून 2020 रोजी संच मान्यता व वैयक्तिक मान्यता द्यावी म्हणून पत्र दिले आहे असे असतानाही याबाबत अद्यापही कोणतीच कार्यवाही होत नसल्याने संस्था चालक लहू बनसोडे यांनी त्यांच्या राहत्या घरी गुरूवार,दिनांक 20 ऑगस्ट 2020 पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.11 ऑगस्ट रोजी त्यांनी याबाबत प्रशासनास पत्र दिले होते.राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना 17 ऑगस्ट रोजी दिलेल्या निवेदनात बनसोडे यांनी नमूद केले आहे की,सामाजिक न्याय विभागाचे आश्रमशाळा अनुसूचित जाती विभागाचे अधिकारी याप्रश्नी कोणतीच कार्यवाही करत नसल्याने आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचे,शिक्षकांचे आणि शाळेचे खच्चीकरण होत आहे.म्हणून नाविलाजास्तव मला हे उपोषण करावे लागत आहे.निवेदनातील पुढील मागण्या अशा जुलै-2011 रोजीच्या शासन निर्णयानुसार या शाळेला तात्काळ संचमान्यता मिळावी,हेतुपुरस्सरपणे शाळेला एलईडी टी.व्ही दिलेला नाही.तो तात्काळ देण्यात यावा.सदरील शाळेला प्रशासनाकडून कोणत्याही बैठकीचे पत्र दिली जात नाहीत.ते दिले जावे.वेळोवेळी अवमान केला जातो.14-6-2006 रोजी शासनाने मान्यता दिली.2006 सालापासूनचे 100 टक्के अनुदान मिळावे.सदरील शाळेला मान्यता असताना तसेच दिनांक 08-03-2019 रोजी अनुदान असताना सुद्धा प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे संस्थेची प्रगती खुंटली आहे.तरी संस्थेची मान्यता व 20 टक्के अनुदानित शाळेचा विचार करावा.2006 साला पासून ते आजतागायत 100 टक्के अनुदान यासह संच मान्यता,वैयक्तिक मान्यता द्यावी या मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.निवेदनाच्या प्रतीलीपी सामाजिक न्यायमंत्री ना.धनंजय मुंडे,जिल्हाधिकारी बीड,उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई,सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय विभाग,पोलीस उपाधिक्षक,केज व पोलीस निरीक्षक युसुफ वडगांव यांना देण्यात आल्या आहेत.