21 आणि 22 ऑगस्ट रोजी ही होणार व्यापा-यांची रॅपीड अँटिजेन चाचणी
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
अंबाजोगाई शहरात कोरोना साथजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून ‘मिशन झीरो अंबाजोगाई’ ही मोहीम नगरपरिषद अंबाजोगाई,राज्य सरकारचा आरोग्य विभाग,भारतीय जैन संघटना,रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी आदींच्या वतीने दिनांक 18,19 आणि 20 ऑगस्ट 2020 रोजी राबविण्यात आली.तसेच पुढेही
दिनांक 21 आणि 22 ऑगस्ट 2020 रोजी ही या टेस्ट सुरूच राहणार आहेत.या मोहीमेअंतर्गत अंबाजोगाई शहरातील उर्वरीत व्यापारी बांधवांची मोफत अँटिजेन चाचणी करण्यात येणार आहे.तरी ‘मिशन झीरो अंबाजोगाई’ या मोहिमेत जास्तीत-जास्त व्यापारी बांधवांनी सहभागी होवून आपली अँटिजेन चाचणी करून घ्यावी असे आवाहन अंबाजोगाई नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्षा सौ.रचनाताई सुरेश मोदी,उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे,माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी,मुख्याधिकारी यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार,जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी अंबाजोगाई नगरपरिषदेला अॅण्टीजेन टेस्ट करून घेण्यासाठी पत्र दिले.त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात,नगरपरिषद प्रशासन,तालुका आरोग्य विभाग,रोटरी क्लब अंबाजोगाई आणि भारतीय जैन संघटनेचे प्रमुख शांतीलालजी मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाईत 18,19 आणि 20 ऑगस्ट रोजी सर्व व्यापारी बांधवांचे अॅण्टीजेन टेस्ट घेण्याचे ठरले.गुगल अॅपच्या माध्यमातून नोंदणी फॉर्म तयार करण्यात आला.सर्व व्यापारी बांधवांना आवाहन करण्यात आले.त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला.तब्बल 9 हजार जणांनी नोंदणी केली.त्यानुसार शहरात 4 केंद्र व 2 कंटेनमेंट झोनमध्ये अशा 6 ठिकाणी या चाचण्या करण्याचे ठरले.नोंदणी केलेल्या व्यापारी बांधवांना रीतसर संदेश पाठवून कोणत्या केंद्रावर टेस्ट करायचे याबाबतची माहिती देण्यात आली.तीन दिवसांत प्रशासनाची खूप मदत झाली अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर यांच्या मदतीने तहसीलदार संतोष रूईकर यांनी उत्कृष्ट नियोजन करून टेस्ट केल्या.अंबाजोगाईत दोन टक्के व्यापारी हे बाधित असल्याचे आढळून आले.या मोहीमेसाठी सहकार्य करणा-या सर्वांचे आभार.पुढील काळात कोरोना संसर्गाचे हे प्रमाण शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट आहे.त्यासाठी सर्व राजकीय पक्ष,स्वयंसेवी संघटना यांना सोबत घेऊन हे काम करावयाचे आहे.ज्या व्यापारी बांधवांच्या तपासण्या राहिल्या असतील त्यांच्या 21 आणि 22 ऑगस्ट रोजी रीतसर टेस्ट करण्यात येतील.कुणीही घाबरू नये.कारण,यापुढे अंबाजोगाई शहरामध्ये व्यवसाय करणेसाठी व्यापारी बांधवांना अॅन्टीजन टेस्ट करून घेणे अनिवार्य राहील याची नोंद घ्यावी,ज्यांना काही लक्षणे असतील त्यांनी तात्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधावा.गणेशोत्सव हा प्रबोधनाचा उत्सव असून अंबाजोगाईतील व्यापारी बांधवांनी फिजीकल डिस्टन्स पाळून,मास्क व सॅनीटायझर वापरावे,सतर्क राहून काळजी घ्यावी असे आवाहन माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले आहे.
“मिशन झिरो अंबाजोगाई” मोहीमेला अनेकांचे सहकार्य
अंबाजोगाई शहरातील कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी आयोजित “मिशन झिरो” मोहीमेला अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर,अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर,तहसीलदार संतोष रूईकर,पोलिस निरीक्षक सिध्दार्थ गाडे,नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. रचनाताई मोदी,उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे,सर्व पक्षीय गटनेते आणि नगरसेवक,मुख्याधिकारी,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बालासाहेब लोमटे,
डॉ.रणजित जाधव,डॉ.अभिजीत सांगळे,डॉ.प्रदीप दामा,आरोग्य सहाय्यक,आरोग्य कर्मचारी,गटशिक्षणाधिकारी,भारतीय जैन संघटनेचे संघटक धनराज सोळंकी,तालुकाध्यक्ष निलेष मुथा,सचिव अधिकार मर्लेचा,रोटरीचे उपप्रांतपाल संतोष मोहीते,रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीचे अध्यक्ष डॉ.निशिकांत पाचेगावकर,सचिव कल्याणराव काळे,पोलिस प्रशासन,शिक्षक बांधव,आरोग्य विभागातील कंञाटी कर्मचारी आदींचेही सहकार्य लाभले त्या सर्वांचे राजकिशोर मोदी यांनी आभार मानले आहेत.
*मोफत रॅपीड अँटिजेन चाचण्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद*
=================
अंबाजोगाई शहरात कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आदेशानुसार आणि बीड जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरातयांचे मार्गदर्शनाखाली आणि भारतीय जैन संघटनेचे प्रमुख शांतीलालजी मुथा यांच्या प्रेरणेने कोरोना प्रतिबंधक उपाययोजनाची अंमलबजावणी करणेसाठी तहसीलदार संतोष रूईकर यांचे नियंञणखाली अंबाजोगाई शहरातील (कन्टेन्मेंट झोन सहीत) सर्व व्यापारी,व्यावसायिक यांची रॅपीड अॅन्टीजन टेस्ट आरोग्य विभागामार्फत दिनांक 18.19 व 20 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत करण्यात आली.रॅपीड अँटिजेन चाचण्यांसाठी व्यापारी व त्यांच्या कामगारांच्या नाकातील स्ञावाचे नमुने (स्वॅब) तपासणी करीता घेण्यात आले.या तपासण्या पुर्णपणे मोफत आहेत.फिजीकल डिस्टन्स पाळून व शासन निर्देशानुसार शहरातील 4 केंद्रांवर 4000 तसेच 2 कन्टेन्मेंट झोन मध्ये 1500 अशा एकूण 5500 एवढ्या अॅण्टीजेन टेस्ट करण्यात आल्या.मोफत रॅपीड अँटिजेन चाचण्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.सुमारे 9 हजार जणांनी नोंदणी केली हे विशेष.