Last Updated by संपादक
सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगाव तालुक्यात 9 गावात गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून त्यापैकी सात गावांमध्ये एक गाव,एक गणपती संकल्पना पोलिसांनी यशस्वी केली असून सोयगाव शहर पाच मंडळे आणि आमखेड्यात दोन मंडळांनी परवानगी घेतली आहे त्यामुळे सोयगाव तालुक्यात केवळ 9 गावात गणेशोत्सव साजरा करण्यात येत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी दिली
सोयगाव तालुक्यात मागील वर्षी 44 गावात गणेशोत्सवासाठी सोयगाव पोलीस ठाण्यातून परवानगी घेण्यात आली होती त्यामध्ये 12 गावात एक गाव एकएक गणपती संकल्पना यशस्वी झाली होती यंदाच्या वर्षी कोरोना संसर्गच्या सावट मुळे तब्बल 33 गावांनी गणेशोत्सव घरातच साजरा करण्याचा निर्णय घेतला असून सात गावांनी एक गाव एक गणपती योजनेत सहभागी झाले आहे दरम्यान यंदाच्या गणेशोत्सवात सोयगाव पोलिसांच्या वतीने मंडळांना वृक्षलागवड,सामाजिक जनजागृती आदी उपक्रम राबविण्यात येऊन गणेश मंडळा जवळ पाच जणांच्या व्यतिरिक्त एकही व्यक्ती राहणार नसल्याची शाश्वती या मंडळांनी परवानगी घेतांना दिली आहे
–––-––-–
सोयगाव तालुक्यात सायंकाळी उशिरा पर्यंत घराघरात गणेशोत्सव साजरा करण्याचा उत्साह पहावयास मिळाला रात्री उशिरापर्यंत गणेशाची स्थापना घराघरात करण्यात आली होती
–––—–
पोलिसांच्या जनजागृतीचे फलित-
सोयगाव तालुक्यात सोयगाव पोलिसांनी आठवडाभर घेतलेल्या कोरोना संसर्ग यामुळे पोळा,गणेशोत्सव साजरा करण्यासाठी केलेली जन जागृती यामुळे सोयगाव तालुक्यात गणेशभक्त गणेशोत्सव घरातच साजरा करण्याचा निर्णय घेतला असून पोलीस निरुक्षक सुदाम शिरसाठ,विकास लोखंडे यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 51 गावात राबविलेल्या जनजागृतीचे हे फलित आहे
–––———–
पाच गावांचे थेट पोलीस ठाण्याला पत्र-
यामध्ये जरंडी,बहुलखेडा,वाकडी,तितुर, उपल्लखेडा, पळाशी, वडगाव,या सात गावांच्या ग्राम पंचायतींनी थेट सोयगाव पोलीस ठाण्यात गणेशोत्सव साजरा न करण्याबाबत लेखी पत्रच दिले आहे
–-–—————-
एक गाव,एक गणपती साजरा करणारी गावे—–
तिडके, नांदगाव तांडा,बोरमाळतांडा,घोसला,वाडी,वरठाण, हनुमंतखेडा या सात गावांनी एक गाव,एक गणपती संकल्पना राबविले आहे