सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― जरंडी ता.सोयगाव येथे असलेल्या बी.एस.एन.एल च्या एकमेव मनोऱ्या कडे संबंधित विभागासह या मनोऱ्याची देखभालीसाठी जबाबदारी घेतलेल्या संबंधित कंपनीचे ही दुर्लक्ष झाले असून या मनोऱ्याची स्थिती धूळखात पडून आहे आठवडाभरापासून या मनोऱ्याची सेवा खंडित झाली असूनही याकडे दुर्लक्ष झाले आहे.
जरंडी ता सोयगाव येथे असलेल्या एकमेव बी. एस.एन.एल च्या मनोऱ्यात आठवडा भरापासून बिघाड झालेला आहे या बिघाड दूर करण्यासाठी बी.एस.एन.एल विभागाला वेळ मिळत नसल्याचे बोलले जात असून या मनोऱ्याची देखभालीसाठी एका खासगी कंपनीला जबाबदारी देण्यात आली असून या खासगी कंपनीचा कर्मचारी मात्र उंटा वरून शेळ्या हाकण्याचे काम करत आहे गेल्या सहा महिन्यात या खासगी कंपनीचा कर्मचारी देखभाल साठी एकदाही आलेला नाही त्यामुळे मनोऱ्याच्या अडचणीत वाढ होऊन आठवडाभरापासून सेवा ठप्प आहे जरंडी सह पाच गावांना या मनोऱ्याची सेवा देण्यात येते,परंतु मनोराची सेवा ठप्प झाल्याने जरंडी,माळेगाव, पिंपरी,बहुलखेडा, कंकराळ, या पाच गावातील हजारो बी.एस.एन.एल ग्राहक वैतागले आहे.
बँकांचे कारभार बंद-
जरंडी गावात दोन बँका आहे या बँकांचा ऑनलाइन कारभार चालू झालेला आहे परंतु मनोराबंद असल्याने बँकांना व्यवहार करण्यासाठी मोठया अडचणी निर्माण झाल्या आहेत.