55 जणांचे रक्तदान-राजकिशोर मोदी यांची माहिती
अंबाजोगाई (प्रतिनिधी): माजी पंतप्रधान राजीव गांधी
यांची आज 75 व्या जयंतीनिमित्त बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे वतीने आयोजित शिबीरात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी ही स्वता: रक्तदान करून दिवंगत नेते राजीव गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केली.बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने गुरूवार,दिनांक 20 ऑगस्ट रोजी आयोजित रक्तदान शिबिरात काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह सहाव्या टप्प्यात 55 जणांसह आजपर्यंत एकूण 280 जणांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सध्या अंबाजोगाईसह राज्यात लॉकडाऊनची परस्थिती आहे.तर दुसरीकडे रक्ताचाही तुटवडा ही मोठ्या प्रमाणात जाणवतोय.ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार जिल्हा काँग्रेसने पुन्हा सहाव्या वेळी गुरूवार,दि.20 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.रक्तदान शिबिराच्या प्रारंभी दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 75 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,नगरसेवक मनोज लखेरा,सुनिल व्यवहारे,राणा चव्हाण,गणेश मसने,अधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रे,रक्तपेढी विभागप्रमुख डॉ.अरविंद बगाटे,डॉ.कटवले,कचरूलाल सारडा हे उपस्थित होते.या शिबिरात बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,नगरसेवक सुनील व्यवहारे,राणा चव्हाण,कचरूलाल सारडा,सचिन जाधव,मेहबूब गवळी,सलीम पिंजारी,महेश वेदपाठक,अशोक दहिभाते,सतीश सातपुते,दयानंद गुजर, रमजान परसूवाले,विक्रम रणदिवे,अफसर खान, गुलशेर पठाण,अजमल पठाण,ताहेर पठाण,फेरोज पठाण, शरद चव्हाण,सलमान शेख,हबीब शेख,शकील तांबोळी, मजहर गवळी,अहमद गवळी,सिद्धेश्वर स्वामी,असेफ गवळी, शेख अजीम,संतोष साबणे,शरद बोराडे,अस्लम जरगर,शेख समीर, असेफोद्दीन काजी,योगेश पतंगे, आदिनाथ लाड,नागनाथ साबणे, नितीन शिंदे,दिनेश शिंदे,अनंत मलवाड, मुजफ्फर शेख,महेबूब गवळी,शेख शाहरूख,संदीप दरवेशवार,प्रदीप काकडे,धनराज आचार्य,शेख मोबीन, सय्यद अमीर,सय्यद जाफरी,अतिष केदार, शेख मुख्तार,अभिजित पवार,मेघराज चाटे,रवी चव्हाण,शरद पवार,सौरभ गुंजाळ असे एकूण 55 जणांनी रक्तदान केले.तर शिबिराच्या यशस्वितेसाठी डॉ.विनय नाळपे यांचे मार्गदर्शनाखाली वाल्मिक कांबळे,रामदासी यांचे सहकार्य लाभले.रक्तदात्यांना वेळ ठरवून दिल्याने रक्तदान शिबीराच्या ठिकाणी गर्दी झाली नाही.आयोजकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करीत प्रत्येकांमध्ये किमान एक मीटर इतके सुरक्षित अंतर ठेवून सॅनिटायझर आणि मास्कची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
*रक्तदानातून काँग्रेस कार्यकर्त्यांची सामाजिक बांधिलकी-राजकिशोर मोदी*
====================
सामाजिक बांधिलकी जोपासत आरोग्य सेवेला मदत व सहकार्य करण्याच्या विधायक हेतूने
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने सहाव्या टप्प्यात 55 जणांसह आजपर्यंत एकूण 280 जणांनी रक्तदान केले आहे.येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने तसेच राज्याचे महसुलमंञी तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात
आणि आरोग्यमंत्री ना.राजेशजी टोपे यांनी आपल्या सर्वांना काही दिवसांपूर्वीच आवाहन केल्यामुळे बीड जिल्हा काँग्रेसने 3 एप्रिल,10 एप्रिल,14 एप्रिल,1 मे,11 मे आणि 20 ऑगस्ट 2020 रोजी सहाव्या टप्प्यात असे 6 वेळा आयोजित शिबीरात मिळून 280 जणांनी रक्तदान केले आहे.आजच्या शिबिरात ही एकूण 55 जणांनी रक्तदान केले.त्या सर्व रक्तदात्यांचे आभार.पुढील काळात रूग्णालयाच्या आवश्यकतेनुसार आणि टप्प्याटप्प्याने असे मिळून एकूण 500 काँग्रेस कार्यकर्ते रक्तदान करणार आहेत अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी यावेळी दिली.