स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये अंबाजोगाई नगरपरिषदेची नेत्रदिपक कामगिरी ,गतवर्षीच्या 611 व्या स्थानावरून थेट 59 व्या स्थानावर झेप

Last Updated by संपादक

अंबाजोगाई (प्रतिनिधी): केंद्र शासनामार्फत जानेवारी-फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात अंबाजोगाई नगरपरिषदेने नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे.गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी करीत देशातील 4 राज्यांच्या पश्चिम विभागातील एक लक्ष पेक्षा कमी लोकसंखेच्या 139 शहरात 59 वे स्थान मिळविले आहे.व गतवर्षीच्या 611 व्या स्थानावरून थेट 59 वे स्थानावर झेप घेत अंबाजोगाई
नगरपरिषद महाराष्ट्रात कौतुकास पात्र ठरली आहे.नगरपरिषद अंबाजोगाई मराठवाड्यातील अग्रगण्य नगरपरिषद असून शासनाच्या स्पर्धात्मक बाबींमध्ये नेहमीच अग्रस्थानी आहे.यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान मध्ये सुद्धा सातत्याने चांगली कामगिरी करत 2007 मध्ये महाराष्ट्रात दुसरे तसे 2008 मध्ये मराठवाड्यात पहिले स्थान मिळविण्याचा बहुमान अंबाजोगाई पालिकेला मिळाला आहे.2019 च्या स्वच्छ सर्वेक्षणात अंबाजोगाई शहरात नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत पश्चिम विभागात पहिले स्थान मिळाले होते.राष्ट्रीय पातळीवर गतवर्षी नवी दिल्ली येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात पारितोषिक प्राप्त करणेचा सन्मान नगरपरिषदेस
मिळाला होता हे विशेष.तीच परंपरा यावेळी ही कायम ठेवत नगरपरिषदेने याही वर्षी उत्तम कामगिरी केली आहे.

केंद्र शासनाच्या स्वच्छता व आरोग्य मंत्रालयामार्फत 2016 पासून दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षणाची
परीक्षा घेण्यात येते.2020 मध्ये 6000 गुणांचे गुणांकन होते.अंबाजोगाई नगरपरिषदेने 3176 गुण प्राप्त केले आहेत.यात घनकचरा व्यवस्थापन,शौचालयांचे व्यवस्थापन,नागरिकांचा सहभाग,सांडपाण्याचे व्यवस्थापन अशा विविध बाबींमध्ये नगरपरिषदेने केलेल्या कामगिरीचे मुल्यांकन होऊन गुणांकन केले जाते.राजकिशोर मोदी यांचे मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई नगरपरिषदेने राबविलेल्या विविध योजनांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे स्वच्छ
सर्वेक्षण-2020 मध्ये हे यश प्राप्त झाले आहे.त्यामध्ये घंटागाडीद्वारे शहरात घरोघरी जावून कचरा गोळा करणे,ओला-सुका कचरा विलगीकरण करणे,घरोघरी तयार होणा-या ओल्या कच-यापासून गांडूळ खत तयार करणे,नगरपरिषदेने ओल्या कच-यापासून गांडूळ खत तयार करणारे 25 संयंत्र विविध भागात बसविले आहेत.तसेच नगरपरिषदेच्या स.नं.17 कचरा डेपो येथे ओल्या कच-यापासून गांडूळ खत तयार करणेसाठी स्वतंत्र कक्ष तयार केला असून यांत्रिकीकरणाद्वारे कंपोस्ट खत तयार करण्यात येते.त्याचप्रमाणे घनकचरा व्यवस्थापन आराखड्याची योग्य अंमलबजावणी नगरपरिषदेने केली आहे.नगरपरिषदेने केलेल्या योग्य नियोजनामुळे शहरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.स्वच्छता अॅप वरील तक्रारींचे निराकरण करणे तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2020 च्या प्रत्यक्ष
मूल्यमापनावेळी आलेल्या पथकाने नागरिकांना विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे दिल्याने नागरिकांचा सहभाग (Citizen’s Feedback) या विभागात नगरपरिषदेस चांगले गुणांकन प्राप्त झाले आहे.नगरपरिषदेच्या या यशामध्ये नगराध्यक्षा सौ.रचना सुरेश मोदी,तत्कालीन मुख्याधिकारी डॉ.सुधाकर जगताप,जेष्ठ सदस्य राजकिशोर मोदी,तत्कालीन उपाध्यक्षा सौ.सविता अनंत लोमटे यांच्यासह इतरांचा मोलाचा वाटा आहे.वेळोवेळी त्यांनी केलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे नगरपरिषदेस हे यश प्राप्त झाले आहे.तसेच स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे,नोडल अधिकारी अजय कस्तुरे,शहर समन्वयक गितांजली होनमाने यांनी स्वच्छ सर्वेक्षणाचे कामी केलेल्या प्रयत्नांचाही यात सहभाग आहे.नगरपरिषदेने केलेल्या प्रयत्नांमध्ये नागरिकांचाही मोठा सहभाग आहे.घरोघरी तयार होणारा कचरा विलगीकरण करणे,ओल्या कच-यापासून गांडूळ खत तयार करणे,स्‍वच्‍छ सर्वेक्षणातील विविध कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवणे यामध्ये अंबाजोगाईकर नागरीक हे उत्स्फूर्तपणे सहभागी होतात.त्यामुळेच हे यश प्राप्त झाले आहे.नगरपरिषदेने केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी स्वच्छ
सर्वेक्षणात नगरपरिषदेची कामगिरी उंचावत राहील असा विश्वास काँग्रेसचे गटनेते राजकिशोर मोदी,उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे,भाजपाच्या गटनेत्या सौ.संगीता दिलीपराव काळे,राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेत्या सौ.राजश्री अशोक मोदी यांनी व्यक्त केला आहे.

देशात पहिल्या 25 शहरात अंबाजोगाईचा समावेशासाठी प्रयत्न व्हावेत

केंद्र शासनामार्फत जानेवारी-फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात अंबाजोगाई नगरपरिषदेने नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे.गतवर्षीच्या तुलनेत पुन्हा सरस कामगिरी करीत देशातील 4 राज्यांच्या पश्चिम विभागातील एक लक्ष पेक्षा कमी लोकसंखेच्या 139 शहरात 59 वे स्थान मिळविले आहे आणि गतवर्षीच्या 611 व्या स्थानावरून थेट 59 व्या स्थानावर झेप घेत अंबाजोगाई
नगरपरिषद महाराष्ट्रात कौतुकास पात्र ठरली आहे.मिळालेल्या यशाचे मानकरी हे संपुर्ण अंबाजोगाईकर आहेत.त्यामुळे अंबाजोगाईकर नागरिकांनी यापुढे ही आपला सक्रिय सहभाग देऊन व सहकार्य कायम ठेवून देशात पहिल्या पंचवीस शहरांमध्ये अंबाजोगाईचे स्थान निर्माण करण्यासाठी नगरपरिषदेला आपले आशिर्वाद व सदिच्छा द्यावी.कारण,आपल्या शुभेच्छांच्या बळावरच
असे आशादायी चित्र निर्माण झाले आहे.

-राजकिशोर मोदी (गटनेते,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,नगरपरिषद,अंबाजोगाई.)

अंबाजोगाई नगरपरिषदेची सातत्यपूर्ण कामगिरी

वाढते शहरीकरण व नागरिकीकरणाचा ताण पहाता स्वच्छता,वीज आणि पाणी पुरवठा,विविध स्पर्धेत सहभाग,योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून “स्वच्छ,सुंदर आणि हरीत” अंबाजोगाई करण्यासाठी अंबाजोगाई नगरपरिषदेची सातत्यपूर्ण कामगिरी दिलासादायक आहे.यापूर्वी अंबाजोगाई नगरपरिषदेने सन 2003-04 या वर्षापासून संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानात जिल्हास्तर प्रथम,विभागीय पातळीवर प्रथम,सन 2004-05 साली सलग 2 वर्षे राज्यात उत्कृष्ट कामगिरी केली.तर 2005-06 साली सलग 3 वर्षे विशेष,राज्य स्तरांवर विशेष पारितोषिक मिळविले.2006-07 साली औरंगाबाद विभागात प्रथम क्रमांक,राज्यस्तर द्वितीय क्रमांक मिळाला.सन 2008-09 साली विशेष पारितोषिक मिळाले.तर सन 2009-10 साली राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.2011 ते 2015 या कालावधीत ही विविध पुरस्कार मिळाले.2019 मध्ये देशात 611 वे स्थान प्राप्त झाले आणि 2020 साली 59 व्या स्थानावर झेप घेतली.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.