सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―सोयगाव तालुका वकील संघाच्या तालुकाध्यक्षपदी अॅड राजेश गिरी तर उपाध्यक्षपदी अॅड योगेश जावळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सोयगावला आयोजित वकील संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.वकील संघाच्या वार्षिक बैठकीत या निर्णयाचे सूचक अॅड सारंग देशमुख तर अनुमोदक अॅड.धर्मराज सूर्यवंशी यांनी केले यावर सर्वानुमते ठराव संमत करण्यात आला.उर्वरित कार्यकारिणी खालीलप्रमाणे अॅड.सतीश सूर्यवंशी(सचिव) अॅड.पी.एम चौधरी(कोषाध्यक्ष)अॅड सचिन गिरी,अॅड अंबादास जाधव,अॅड.सारंग देशमुख,प्रसन्न फासे,रवींद्र पाटील,धर्मराज सूर्यवंशी,अतुल कुलकर्णी आदींची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.