औरंगाबाद जिल्हासोयगाव तालुका

सोयगाव तालुक्यात विनामास्क कारवाईसाठी चार पथके ,मंडळस्तरीय तीन पथके तैनात

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―सोयगावसह तालुक्यात विनामास्क भटकंती करणाऱ्या अथवा तोंडाला रुमाल न वापरणाऱ्या पादचाऱ्याविरुद्ध कारवाईसाठी शहरात एक आणि ग्रामीण भागात मंडळनिहाय तीन असे चार पथके तैनात करण्यात आली असून या विरुद्धच्या कारवाईत पाचशे रु दंड आणि दोन मास्क देण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार प्रवीण पांडे यांनी दिली.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढता झाला आहे.त्यासाठी जिल्हाधिकारी यांनी व्हिडियो कोन्फरंसद्वारे घेतलेल्या आढावा बैठकीत विनामास्क फिरणाऱ्यावर कारवाईचा बडगा उचलण्याच्या सूचना जिल्ह्यातील तहसीलदारांना दिल्या असून या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी सोयगाव शहरात नगर पंचायतीचे एक आणि ग्रामीण भागात तीन पथके ग्रामपंचायत स्तरावर स्थापन करण्याच्या सूचना सोयगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे यांना दिल्या असून गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे यांनी या हालचाली हाती घेतल्या आहे.त्यामुळे आता सोयगाव तालुक्यात विनामास्क अथवा रुमाल न वापरणाऱ्याविरुद्ध कारवाईचे ठोस पावले उचलली जाणार आहे.मंडळ स्तरीय पथकात मंडळ अधिकारी,पोलीस कर्मचारी,तलाठी आणि ग्रामसेवक यांचा समावेश असणार आहे.

पुन्हा प्रसिद्धी पत्रकाद्वारे महसूल,आरोग्य विभागाची जनजागृती–

महसूल आणि आरोग्य विभागाकडून कोरोना संसर्गाबाबत पुन्हा प्रसिद्धी पत्रकाद्वारे जनजागृती करण्यात आली असून महसूल विभागाने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे कि कामाशिवाय घराबाहेर पडू नका,हात धुवून अन्न सेवन करा,सार्वजनिक ठिकाणी वावरतांना नाक व तोंड मास्क अथवा रुमालाने झाकावे,सुरक्षित अंतर ठेवावे अशा सूचना तालुक्यातील नागरिकांना केल्या आहे.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.