अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणासाठी कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ करणार जनआंदोलन

राज्यपाल,मुख्यमंत्री यांना निवेदन ; लाँगमार्च-घंटानाद करून जनजागृती

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षण यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघातर्फे वारंवार निवेदने देण्यात आली.4 सप्टेंबर 2019 रोजी महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून धरणे आंदोलन करण्यात आले.

तरी परंतु पदोन्नतीतील आरक्षणाबाबत सरकारने काहीही केले नाही.मागासवर्गींयावर राज्यात अन्याय अत्याचार वाढले असून मागासवर्गीय अधिकारी व
कर्मचा-यांवर षडयंत्र करून अन्याय केला जात आहे.त्यामळे आता मागासवर्गीयांचा संयम संपत आला आहे.महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली आहे.कृपया याची नोंद घेवून मागासवर्गीयांना न्याय द्यावा याकरिता
आंदोलन पूर्व नोटीस देण्यात येत आहे.शासनाने दखल न घेतल्यास महाराष्ट्रभर लॉंगमार्च काढण्यात येईल.हा लाँगमार्च प्रत्येक जिल्ह्यातून घंटानाद यासह दोन टप्प्यात आंदोलन करून जनजागृती करणार आहे.तसेच बदली कर्मचा-यांच्या सेवा नियमित करणे याप्रश्नी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे वतीने सोमवार,दिनांक 24 ऑगस्ट रोजी राज्याचे महामहीम राज्यपाल,मुख्यमंत्री,मुख्य सचिव यांना उपजिल्हाधिकारी यांचे मार्फत निवेदन देण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे वतीने सोमवार,दिनांक 24 ऑगस्ट रोजी राज्याचे महामहीम राज्यपाल,मुख्यमंत्री,मुख्य सचिव यांना महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे
राज्याध्यक्ष अरूणजी गाडे यांचे नेतृत्वाखाली लातूर विभागीय अध्यक्ष बालासाहेब सोनवणे,उपाध्यक्ष संतोष बोबडे,जिल्हा उपाध्यक्ष बप्पाजी कदम,जिल्हा सहसचिव एम.एम.गायकवाड,जिल्हा कार्याध्यक्ष रमेश लोखंडे यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात पुढील संदर्भ देत नमूद केले आहे की,1) मा. न्यायालयीन कक्ष क्रं. 2/757/99 दि. 09.07.1999., 2) मा.अधिक्षक रूग्णालय विभाग,अंबाजोगाई यांचे पत्र क्रं.वैमरू/ न्यायालयीन कक्ष क्रं. 2/757/99 दि 1.11.1999.,3)मा.ग.शा.सोनावणे,उपसचिव,महाराष्ट्र शासन यांचे शासन आदेश क्रं.न्यायप्र/115/प्र.क्रं.32/15/वैसेवा व वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांचे संदर्भ क्रं.1 नुसार बदली कर्मचा-यांना आवश्यकतेनुसार सेवेत घ्यावे असे मा.न्यायालयाचे आदेश आहेत.संदर्भ क्रं.2 नुसार
दिनांक 04.11.1999 रोजी काही कर्मचा-यांना सेवेत समाविष्ट करून घेतले तर संदर्भ क्रं.3 नुसार उर्वरित कर्मचा-यांना सेवेचे 10 वर्षे झाली पाहिजे व प्रतिवर्षी 240 दिवस कामाचे भरले पाहिजे अशी अट टाकून अन्याय करण्यात आला आहे.कारण,सेवेचे आदेश रूग्णालय प्रशासनच देते.परंतु,असे आदेश न दिल्याने अनेक कर्मचारी यांचे सेवेचे 25 वर्षे तर पुर्ण झाले.परंतू,प्रतिवर्ष कामाचे 240 दिवस माञ भरले नसल्याचे सांगणा-या प्रशासनामुळे मागील 25 वर्षे सातत्याने सेवा करणा-या बदली कर्मचा-यावर अन्याय होत आहे.प्रशासनाची ही भुमिका अन्यायकारक आहे.करिता महाराष्ट्र शासनाने पुढील मागण्यांची दखल घ्यावी असे आवाहन कास्ट्राईब महासंघातर्फे करण्यात आले आहे.शासनाने पुढील मागण्यांची दखल घेण्याकरिता आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणजे सर्व जिल्हाधिका-यांना दिनांक 20 ऑगस्ट 2020 रोजी महासंघाच्या प्रत्येक जिल्हाशाखांतर्फे निवेदन देणे व मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलनाचा दुसरा टप्पा दिनांक 26 सप्टेंबर 2020 पासुन नागपूर ते मुंबई असा लाँग मार्च करण्यात येईल.निवेदनातील मागण्या पुढील प्रमाणे आहेत.1) मागासवर्गीयांना तात्काळ पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करावे.,2) पदोन्नतीसाठी उच्चस्तरीय समिती गठित करून या समितीमध्ये कास्ट्राईब महासंघाचा समावेश करावा.,3)एम.नागराज प्रकरणात दिलेल्या अटीनुसार मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील
आरक्षणाबाबत संपूर्ण आकडेवारी एकत्रित करून प्रलंबित याचिकेच्या अंतिम
सुनावणीसाठी निष्णात वकिलांची नियुक्ती करावी.पदोन्नतीमधील रिक्त पदांचा अनुशेष भरून काढण्यात यावा तसेच कनिष्ठांना दिलेली पदोन्नती तात्काळ रद्द करावी.,5) सरळ सेवा भरतीमधील रिक्त पदांचा अनुशेष भरण्यासाठी विशेष भरती मोहिम राबविणे.,6) मागासवर्गीयांच्या शैक्षणिक बजेटमध्ये वाढ करावी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी
बंद केलेली फ्रीशिप लागू करावी.,7)परदेशी शिष्यवृत्ती व इतर शैक्षणिक शिष्यवृत्तीकरिता उत्पन्नाची अट घटनाबाह्य असल्याने रद्द करण्यात यावी.8) परदेशी शिष्यवृत्तीची संख्या 500 पर्यंत वाढविण्यात यावी व 1000 मानांकन
असणा-या परदेशी विद्यापीठात प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करावी.,9)राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये सर्व विभाग एकत्र करून आरक्षण लागू करणे.,10) सर्व कंत्राटी कर्मचारी,बदली कर्मचारी (हंगामी), आरोग्य सेवक-सेविका यांना शासन सेवेत विनाअट कायम करणे,कोरोना संकटकाळी अनेक बदली कर्मचारी यांचा
प्रादुर्भावामुळे मृत्यू झाला आहे.कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या बदली कर्मचारी यांच्या कुटुंबियांना सरकारने तात्काळ आर्थिक मदत द्यावी.,11) सन 2005 नंतर नियुक्त शिक्षकांचे NPS चे फॉर्म भरणे तात्काळ रद्द करून GPF कपात सुरू करावी व जुनी पेन्शन योजना पुर्ववत लागु करण्यात यावी या मागण्यांसाठी नागपूर दीक्षाभूमी ते मुख्यमंत्री यांचे निवासस्थान ‘वर्षा’ बंगला,मुंबई असा ‘आरक्षण बचाव मार्च’ दि.26 सप्टेंबर 2020 पासून सुरू होणार असून तो महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातून फिरून जागोजागी घंटानाद करून शासनाला जागे करणार आहे.कोरोना संकटकाळी अत्यावश्यक आरोग्य सेवा देणारे आणि मागील 25 ते 30 वर्षांपासून स्वाराती रूग्णालयात कार्यरत हंगामी बदली कर्मचारी यांना कायम करावे यासाठी महासंघाचे वतीने यापूर्वी ही दिनांक 27 मे 2020 रोजी राज्यपाल व मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे.

आंदोलनाचा पहिला टप्पा :-

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघातर्फे सर्व जिल्हाधिकारी यांचे मार्फत दि.20 ऑगस्ट 2020 रोजी वरील मागण्यांचे निवेदन पाठविणे.शासनाने दखल न घेतल्यास अथवा कुठलीही कारवाई न केल्यास आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू होईल.

आंदोलनाचा दुसरा टप्पा नागपूर ते मुंबई लॉंग मार्च :-

दीक्षाभूमी नागपूर येथून या लॉंगमार्चची सुरूवात दि.26 सप्टेंबर 2020 रोजी परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून होईल.या लाँग मार्चमध्ये 4 चाकी
वाहनांचा समावेश असेल आणि हा मार्च नागपूर ते महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात फिरून घंटानाद करून दि.30 सप्टेंबर 2020 रोजी वर्षा बंगला,मुंबई येथे पोहोचेल व त्यानंतर लाँग मार्चचे समापन करण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे विभागीय अध्यक्ष बालासाहेब सोनवणे यांनी दिली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button