सुवर्णवीर पै.राहुल आवारेला ‘अर्जुन’ पुरस्कार

Last Updated by संपादक

पाटोदा:नानासाहेब डिडुळ― महाराष्ट्राचा लाडका मल्ल,बीड जिल्ह्यातील पाटोदा गावाचा सुपूत्र, आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल पुणे वस्तादचा मल्ल,रुस्तुम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदार ,काकासाहेब पवार यांचा शिष्य,राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता,जागतिक कांस्यपदक विजेता, तसेच भामेश्वर विद्यालयाचा माजी विद्यार्थी डि.वाय.एस.पी. पै.राहुल बाळासाहेब आवारे याला केंद्र सरकार चा क्रीडा क्षेत्रातील मानाचा “अर्जुन” पुरस्कार जाहीर झाला.

गतवर्षी गुण पूर्ण असुनही राहुल या सन्मानापासून वंचित होता. यावर्षी मात्र राहुल च्या उण्यापुऱ्या १५ वर्षाच्या कारकिर्दीला न्याय मिळाला.

अन्यायाची अखंड मालिका राहुल ने केवळ गुरूंच्या संस्काराच्या आधारावर पचवली.नित्य नियमित आपल्या ध्येयाची पूजा करत राहुल एक नव्हे,दोन नव्हे अखंड १५ वर्षे कुस्ती क्षेत्रात गरुडभरारी मारत राहिला.राष्ट्रकुल सारख्या,जागतिक कुस्ती स्पर्धेसारख्या मानाच्या स्पर्धेत राहुल ने पदक जिंकले.डि.वाय.एस.पी. प्रशिक्षण घेत असलेला राहुल आवारे यावर्षी अर्जुन पुरस्कारासाठी पात्र ठरला ही तमाम महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे.तसेच भामेश्वर विद्यालयासाठी गौरवाची व अभिमानाची बाब आहे.त्यामुळे भामेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक जाधव.एल.आर., ह.भ.प.रंधवे बापु,ह.भ.प.राधाताई महाराज,अॕड.प्रकाशदादा कवठेकर,दिपकदादा घुमरे,आनंद जाधव,माऊली जरागे,बळीराम पोटे,गणेश नारायणकर, सोमीनाथ कोल्हे,लक्ष्मण सस्ते,नय्युम पठाण,बालाजी जाधव,संदीप जाधव,ॲड.जब्बार पठाण,मधुकर गर्जे, अबलुक घुगे, राजुभैय्या जाधव,शहानवाज सय्यद, उमर चाऊस,मुन्ना अन्सार, पत्रकार पोपट कोल्हे,महेश बेदरे,हमीद पठाण,अनेक राहुलवर प्रेम करणाऱ्यांनी राहुलचे विशेष अभिनंदन केले आहे.

जागतिक विजेता पै.राहुल आवारेचे अभिनंदन – आ.सुरेश धस

महाराष्ट्राचा लाडका मल्ल, बीडचा भूमिपुत्र, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता, जागतिक कांस्यपदक विजेता,डि.वाय.एस.पी. पैलवान राहुल बाळासाहेब आवारे याला केंद्र सरकार चा क्रीडा क्षेत्रातील मानाचा “अर्जुन” पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.!

अखेर स्वप्न साकार झाले

पै.राहुल आवारे आज मला भारत सरकारचा क्रीडा जगतातील सर्वोच्च मानाचा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला.मी सतत प्रामाणिकपणे मेहनत करून सतत विविध स्पर्धा हया जागतिकस्तरापर्यत महाविद्यालयीन जीवनापासून विविध खेळत सतत मेहनत व कष्ट घेत निरंतर कष्टाचे चिज झाले.स्वर्गीय हरिचंद्र बिराजदार मामा यांचे स्वप्न होते व त्यांची शिकवण यावर आज मला हे यश मिळाले आहे.व जिल्हाचे तालुक्याचे गावाचे ही स्वप्न साकार झाले.

―पैलवान राहुल आवारे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.