पाटोदा दि.२३:नानासाहेब डिडुळ― पाटोदा तालुक्यातील संभाजी ब्रिगेडची एकमेव कार्यकारणी बदलणे व संघटनेशी संबंध नसलेल्या व्यक्तीची पाटोदा ता.अध्यक्षपदी नियुक्ती करणे हा जिल्हाध्यक्ष नितिन बावणे यांचा मनमानी कारभार असुन याच्या निषेधार्थ पाटोदा तालुक्यातील संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामुहिक राजीनामे सादर केले.
पाटोदा तालुक्यात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जिवाचे रान करुन संघटना वाढवली. अनेक आंदोलने केली.अनेक कार्यकर्ते संभाजी ब्रिगेडच्या विचारासाठी सदैव्य रस्त्यावर असतात. वाढता विस्तार पाहून एक वैचारिक चळवळ असलेल्या संभाजी ब्रिगेड च्या पाटोदा तालुका अध्यक्षपदी संघटनेशी संबंधित नसलेल्या व एका पक्षाचे काम करत असलेल्या एका कार्यकर्त्याची निवड करण्यात आली. याचा निषेध म्हणुन विद्यमान ता.अध्यक्ष रामदास भाकरे, उपाध्यक्ष अक्षय अर्सुळ,शहरध्यक्ष शंकर घाडगे ,बीड जिल्हा उपाध्यक्ष सोमीनाथ लवुळ व अनेक कार्यकर्त्यांनी सामुहिक राजीनामे दिले.
एकमेव पाटोदा तालुक्यातील कार्यकारणी बदलणे, संघटनेशी संबंध नसलेल्या स्वयंघोषित कार्यकर्त्यांची पदाधिकारी म्हणुन निवड करण्यात आली. आम्ही संघटनेसाठी जिवाचे रान केले. एका पक्षाचे काम करत असलेल्या व फक्त पद मानासाठी घेणे, स्वयंघोषित समाजसेवक असणे व कोणत्याही नेत्यांसमोर सतत उभे राहणारे तुम्ही निवडता हा जिल्हाध्यक्ष नितिन बावणे यांचा मनमानी कारभार आहे.
– रामदास भाकरे, विद्यमान ता अध्यक्ष संभाजी ब्रिगेड, पाटोदा