बांगरवाडी पाझर तलावाच्या संरक्षक भिंतीला तडे , प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने शेकऱ्यांवरच वर्गणी गोळा करण्याची वेळ

Last Updated by संपादक

पाटोदा:नानासाहेब डिडुळ― पाटोदा तालुक्यातील पाटोदा शहराजवळील व तांबाराजुरी क्षेत्रातील बांगरवाडी तलावाच्या संरक्षक भितीला तडे गेले असून त्यातुन पाण्याची गळती होत असल्याने यापरीसरातील रब्बी हंगामात व शहरात पाणी पुरवठास पाणीच तलावात शिल्लक राहणार नाही अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे.
पाटोदा तालुक्यातील तांबाराजुरी गाव व परिसरात यावर्षी वरुणराजाची सुरवातीपासूनच विशेष कृपादृष्टी राहिली आहे.
जून महिन्याच्या अगदी सुरवातीलाच चांगला पाऊस या परिसरात पडला आहे.
तांबाराजुरी गावच्या लगतच असलेला बांगरवाडी पाझर तलाव यामुळे तुडुंब भरला आहे.
बांगरवाडी तलावावर तांबाराजुरी, पाटोदा,बांगरवाडी या तिन्ही गावचा पाणी प्रश्न अवलंबून असतो.
यावर्षी हा तलाव लवकरच भरला गेल्याने या गावांचा पाणी प्रश्न मिटल्याने या परिसरात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
कोणत्याही जिरायती शेती करणाऱ्या या गावांत तलाव भरल्याने काही अंशी का होईना शेतकऱ्यांना बागायती शेती करता येणार आहे.असे असले तरी तलावाच्या संरक्षक भिंतीला तडे गेल्याने व सांडव्याच्या बाहेरील बाजूला मोठे भगदाड पडल्याने मोठया प्रमाणावर पाणी वाहून जात आहे.असे असतानाही झोपच सोंग घेतलेल्या प्रशासनास याचे कसलेही सोयरसुतक दिसत नाहीये.
हे दुरुस्तीचे काम खरे तर प्रशासनाचे आहे पण पाटोदा प्रशासन यांकडे दुर्लक्ष करत आहे.तांबाराजुरी व बांगरवाडी चे शेतकरी वर्गणी गोळा करून हे काम करण्याचा प्रयत्न तर करत आहे पण हे कितपत यशस्वी होईल,याकामी खूप मोठा खर्च लागेल तो नक्कीच शेतकरी वर्ग पेलू शकणार नाही . याविषयी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता कार्यालयात कुणीही उपलबध नव्हते.

प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे नसता आंदोलन करू

बांगरवाडी तलाव निर्मिती पासून हे पहिलेच वर्ष आहे की इतक्या लवकर तलाव संपूर्णतः भरला आहे.पण प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे पाणी वाया जात आहे.प्रशासनाने याची तात्काळ दखल घ्यावी नसता संविधानिक पध्दतीने तीव्र आंदोलन करू.
– लक्ष्मण सस्ते, सामाजिक कार्यकर्ते, बांगरवाडी

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.