अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
येथील मनोज लखेरा मित्र मंडळाच्या वतीने बुधवार,दिनांक 26 व शुक्रवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
करण्यात आले होते.
अंबाजोगाई शहराचे माजी उपनगराध्यक्ष तथा श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन नगरसेवक मनोज लखेरा यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र मंडळाच्या वतीने दिनांक 26 व 27 ऑगस्ट रोजी विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले होते.यावेळी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,नगरसेवक वाजेद खतीब,नगरसेवक सुनील व्यवहारे,नगरसेवक धम्मपाल सरवदे,नगरसेवक अमोल लोमटे,श्री योगेश्वरी पतसंस्थेचे चेअरमन माणिकराव वडवणकर,माजी नगरसेवक सुनील वाघाळकर,राजीव गांधी पंचायतराज संघटनचे विभागीय अध्यक्ष राणा चव्हाण,बीड जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष कचरूलाल सारडा,विजय रापतवार,आनंद कर्नावट,दिनेश घोडके,भारत जोगदंड,सचिन जाधव,अमोल मिसाळ,प्रताप देवकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.बुधवार,दिनांक 26 ऑगस्ट रोजी राज्य परिवहन महामंडळाच्या अंबाजोगाई आगार परीसरात वृक्षारोपण करण्यात आले.तर गुरूवार,दिनांक 27 ऑगस्ट रोजी अंबाजोगाई नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागातील कर्मचा-यांना बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या हस्ते टी-शर्ट,हातमोजे (हॅण्डग्लोज) आणि मास्कचे वाटप करण्यात आले.
सामाजिक बांधिलकी जोपासणारे मनोज लखेरा
नगरसेवक मनोज लखेरा यांनी गेली अनेक वर्षे सातत्याने उल्लेखनिय कार्य केले आहे.ते सामाजिक बांधिलकी जोपासणारे व्यक्तिमत्व असल्याचे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले.पुढे बोलताना मोदी म्हणाले की,आपल्याला मनोज लखेरा यांच्यासारखे उत्तम सहकारी लाभल्याने सामाजिक क्षेत्रात काम करताना त्यांची खूप मदत होते.लखेरा हे कुशल संघटक आहेत,तसेच त्यांचा मित्र परिवार मोठा आहे,विविध सामाजिक उपक्रमात लखेरा यांचा सक्रिय सहभाग असतो.सहकार,सांस्कृतिक तसेच सामाजिक क्षेञाची त्यांना उत्तम जाण आहे.प्रत्येकाच्या सुख-दु:खात मदतीला धावून जाण्याचा लखेरांचा स्वभाव आहे.नगरसेवक म्हणून त्यांनी जनतेची विविध कामे,नागरी समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी आपल्या नगरसेवक पदाचा चांगला उपयोग केला आहे.यापूर्वी लखेरा यांनी रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीचे अध्यक्ष व सचिवपद भूषविले आहे.मंगळवार पेठ येथील साई मंदीर व बस आगारातील दत्त मंदीर उभारणीत त्यांचे मोठे योगदान आहे.शहरात नवराञ महोत्सवानिमित्त दांडीया आणि दस-यानिमित्ताने रावण दहन कार्यक्रमासाठी लखेरा यांचा पुढाकार आहे.त्यांच्या याच स्वभाव वैशिष्ट्यांमुळे मित्र परिवारात ते लोकप्रिय आहेत असे सांगितले.तसेच मित्र मंडळाच्या वतीने राबविण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक करून राजकिशोर मोदी यांनी नगरसेवक मनोज लखेरा यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मनोज लखेरा मित्र मंडळाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला.