योगिराज वाघमारे मृत्यू प्रकरणातील आरोपींना अटक करा – युवा आंदोलन

Last Updated by संपादक

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
तालुक्यातील भतानवाडी येथील मयत योगीराज वाघमारे यांचा अपघात झाला नसून घातपात झाला आहे.अशी शंका मयत योगीराज वाघमारे यांच्या कुटुंबियांना वाटत आहे.याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.परंतू,अद्यापही गुन्हेगार मोकाट आहेत.तरी या प्रकरणातील आरोपींचा शोध घेऊन अटक करून त्यांना कठोर शासन करण्यात यावे अशी मागणी युवा आंदोलनच्या वतीने अंबाजोगाईचे उपजिल्हाधिकारी यांना गुरूवार,दिनांक 27 ऑगस्ट रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

img 20200829 wa00036799502554788083125

याप्रकरणाची निवेदनात नमूद केलेली हकीकत अशी की,अंबाजोगाई तालुक्यातील भतानवाडी येथील मयत योगीराज वाघमारे (वय 27 वर्षे) या युवकाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात बहुजनांच्या न्याय हक्कासाठी लढणारी “युवा आंदोलन” या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक पालके हे पिडीत वाघमारे कुंटूबियांच्या बाजुने उभे राहिले आहेत.मयत योगिराज वाघमारे यांना मृत्यूनंतर तरी न्याय मिळावा यासाठी लढा देत आहेत.निवेदनात नमूद केले आहे की,दिनांक 23 जुलै रोजी योगीराज वाघमारे यांचा अपघातात मृत्यू झाला आहे असे सांगण्यात आले.परंतू,योगीराज वाघमारे यांचा निवाडा पाटी,दत्त मंदीराजवळ (ता.रेणापुर,जि.लातूर) येथे अपघात झाला नसून घातपात झाला आहे.अपघात आहे हे दाखवण्याचा प्रयत्न संबंधीत घटनेतील अज्ञात आरोपी यांनी केला आहे.मयत योगिराज याच्या गाडीची तोडफोड करण्यात आली.त्याच्या जवळील पैसे ही काढून घेतले आहेत.या प्रकरणी योगीराजचे आई,वडील आणि भाऊ यांनी पाठपुरावा करून संबंधीत घटनेची सखोल चौकशी करावी अशी तक्रार रेणापुर पोलीस स्टेशनला दिली.त्यावरून दि.11 ऑगस्ट 2020 रोजी संबंधीत पोलीस स्टेशन मध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल तर झाला.परंतू,अद्यापही आरोपीला अटक झाली नाही.तरी सदरील प्रकरणाची सखोल चौकशी करून अरोपीस अटक करून कठोर कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.सदरील निवेदनावर युवा आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष अशोक पालके,काशिनाथ कांबळे,शिवराज वाघमारे,रामराजे वाघमारे,अनंत झुंजाटे यांच्या स्वाक्ष-या आहेत.निवेदनाची प्रतिलिपी राज्याचे मुख्यमंत्री,गृहमंत्री, सामाजिक न्यायमंत्री आणि जिल्हाधिकारी, बीड यांना माहितीस्तव देण्यात आले आहे.

*सखोल चौकशी करून अरोपीस अटक करा-अशोक पालके*
———————————-
मयत योगिराज वाघमारे घातपात प्रकरणात गुन्हा तर दाखल झाला.परंतू,अद्यापही आरोपीला अटक झालेली नाही.या घटनेत जे आरोपी आहेत.त्यांना तात्काळ अटक करून त्यांची सखोल चौकशी करावी.जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कार्यवाही करावी.तसेच मयत योगीराजच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे.जर शासन व प्रशासन सदरील घटनेतील आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ करेल तर युवा आंदोलन संघटनेच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल त्यास शसन व प्रशासन जबाबदार असेल.असा इशारा युवा आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष अशोक पालके यांनी दिला आहे.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.