Last Updated by संपादक
सोयगाव:आठवडा विशेष टीम― प्रहार संघटनेच्या विविध पदाधिकार्यांच्या निवड प्रक्रियेत जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे यांच्या हस्ते प्रहारच्या शेतकरी संघटनेच्या उपाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील तर जनशक्ती पक्षाच्या उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर वाघ यांची निवड करण्यात आली आहे.या निवडीबद्दल मराठा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोपान गव्हांडे, ज्ञानेश्वर युवरे,अपंग क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप इंगळे,तालुकाध्यक्ष कृष्णा पाटील,सुभाष वाडेकर,ईश्वर इंगळे,दिलीप शिंदे,आदींनी अभिनंदन केले आहे.