अंबाजोगाई (प्रतिनिधी): ज्येष्ठांच्या कल्याणासाठी कार्य करणारे विविध शासकीय कार्यालये व एजन्सी यांचे मार्फत कृती कार्यक्रम राबविण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघ अंबाजोगाई हा सामाजिक बांधिलकी माणून बीड व लातूर या जिल्ह्यातील ज्येष्ठ व अति ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी पुढाकार घेत आहेत.या कामी सर्वांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन बीड जिल्हा व लातूर जिल्हा मास्टर ट्रेनर प्रा.मनोहर कदम,डॉ.डी.आर. पाटील तसेच डॉ. दामोधर थोरात,पुंडलिक पवार यांनी केले आहे.
ज्येष्ठ नागरिक संघाच्या शुक्रवार,दि.1 मार्च रोजी झालेल्या बैठकीत ज्येष्ठांच्या कल्याणासाठी कार्य करणार्या एजन्सी व महसुल,आरोग्य, पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था, गटविकास अधिकारी, राज्य परिवहन महामंडळ,विविध राष्ट्रीयकृत बँका यांच्या मार्फत ज्येष्ठ नागरिकांचे विविध कायदे व त्याबाबतचे धोरण यांची प्रत्यक्ष अमंलबजावणी करून ते राबविण्यासाठी बैठकीत चर्चा झाली.या कामी बीड व लातूर जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिक संघ हे पुढाकार घेत आहेत.या माध्यमातून सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी, एजन्सी व त्यांचे प्रतिनिधी यांना एक दिवसीय प्रशिक्षण शिबीरातून प्रशिक्षीत करण्यात येणार आहे. लातूर व बीड या दोन जिल्ह्यामध्ये शासकीय स्तरांवर यशदा,पुणे यांचे आदेशान्वये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी ज्येष्ठ नागरिक संघ अंबाजोगाई यांनी पुढाकार घेतला असून संघाच्या वतीने हे अतिशय महत्वाचे कार्य सर्व ज्येष्ठ नागरिक यांच्या जीवनाला आधार देणारे आहे.तेव्हा या चांगल्या कामास सर्वांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन ज्येष्ठ व अति ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी पुढाकार घेत आहेत.या कामी सर्वांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन बीड जिल्हा व लातूर जिल्हा मास्टर ट्रेनर प्रा.मनोहर कदम,डॉ.डी.आर. पाटील तसेच डॉ.दामोधर थोरात, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पुंडलीक पवार, कार्याध्यक्ष अॅड.अनंतराव जगतकर,कोषाध्यक्ष धनराज मोरे,सहसचिव पद्माकर सेलमोकर आदींनी केले आहे.या बैठकीस ज्येष्ठ नागरिक संघ अंबाजोगाईचे इतर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
