Last Updated by संपादक
सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगाव शहरातील जिल्हा बँक स्थलांतर करण्याचे पत्र मुख्य व्यवस्थापक राजेंद्र शिंदे यांनी दिल्यावरून तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने या स्थलांतराला विरोध दर्शवित आंदोलनाचा इशारा दिला होता.त्यामुळे खरेदी-विक्री संघाच्या जागेत असलेल्या या बँकेला खरेदी-विक्री संघानेही बँकेला जागा रिकामी करण्याबाबतचा पत्र व्यवहार केला होता.त्या अनुषंगाने शनिवारी खरेदी विक्री संघाचे सभापती राजेंद्र राठोड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या तातडीच्या बैठकीत हात उंचावून या विरोधात थेट मतदान घेण्यात आले यावेळी सहा विरुद्ध आठ असा ठराव पारित करण्यात आला.जिल्हा बँक स्थलांतर करण्याच्या बाजूने आठ संचालक तटस्थ राहिले तर बँकेचे स्थलांतर होवू नये या बाजूने सहा संचालकांनी मतदान केले त्यामुळे बँक स्थलांतर करण्याच्या बाजूने आठ संचालक असल्याने सोयगाव जिल्हा बँकेच्या स्थलांतरावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे.बँकेचे स्थलांतर करा या बाजूने मतदान करणाऱ्या संचालकांनी यामध्ये आपले म्हणणे नमूद केले असून बँकेचे खरेदी विक्री संघाच्या जागेतून स्थलांतर झाल्यास संस्थेला स्वतःचे खते,औषधी विक्रीचे अडचणीत असलेले दुकान या जागेत आणण्यात येईल तसेच उर्वरित गाळे खासगी व्यापाऱ्याला भाडेतत्वावर दिल्यावर संस्थेला अनामत रक्कम दहा लाख मिळून संस्थेला भरीव स्वरुपात भाडे मिळेल यांमध्ये संस्थेचे उत्पन्न वाढेल,बँकेला ठरवून दिल्याप्रमाणे बारा हजार आठशे भाडे असतांना बँक केवळ नऊ हजार इतकेच भाडे संस्थेला अदा करते,आणि किरकोळ दुरुस्तीसाठी वारंवार संस्थेला बँकेकडून पत्र व्यवहार करण्यात येवून वेठीस धरले जाते असे या आठ संचालकांनी म्हणणे मांडून ठराव घेतला आहे.उर्वरित सहा सदस्यांनी बँकेची सध्या असलेली जागा शेतकऱ्यांसाठी पूरक आहे.ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांना बसस्थानक आणि बँक जवळ आहे.त्यातच शहराच्या मुख्य रस्त्यावर जागा असल्याने शेतकऱ्यांना या जागेवर वाहनांच्या पार्किंगसाठी प्रशस्त जागा असल्याचे मत विरुद्ध मतदान करणाऱ्या सहा सदस्यांनी मांडले आहे.संस्थेचे व्यवस्थापक रमेश बेडवाल यांनी बैठकीचे कामकाज पहिले.यावेळी सभागृहात सभापती राजेंद्र राठोड,फिरोज खाटिक,शिवाप्पा चोपडे,शांताराम देसाई,मिलिंद पगारे,नितीन बोरसे,राजू भदाणे,मथुराबाई जैस्वाल,दीपक देशमुख,नंदू सोळुंके,जगन गव्हांडे,उस्मान पठान,अविनाश पाटील,या चौदा संचालकांची सभागृहात उपस्थिती होती.
१)संस्थेच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे बँकेचे संस्थेच्या जागेतून स्थलांतर झाल्यास संस्थेला उत्पन्नाचे साधन मिळेल त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.बँकेशी कोणताही करार करण्यात आलेला नाही.बँकेने या जागेतून स्थलांतर करावे.
–राजेंद्र राठोड
सभापती खरेदी-विक्री संघ सोयगाव