बीड जिल्हा काँग्रेस आयोजित शिबिरात ; 61 जणांचे रक्तदान -राजकिशोर मोदी यांची माहिती

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे वतीने आयोजित सातव्या टप्प्यातील शिबीरात जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 28 आणि 29 ऑगस्ट रोजी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह 61 जणांसह आजपर्यंत एकूण 341 जणांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सध्या अंबाजोगाईसह राज्यात लॉकडाऊनची परस्थिती आहे.तर दुसरीकडे रक्ताचाही तुटवडा ही मोठ्या प्रमाणात जाणवतोय.ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार जिल्हा काँग्रेसने पुन्हा सातव्या वेळी शुक्रवार,दि.28 आणि शनिवार,दिनांक 29 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.यावेळी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,नगरसेवक मनोज लखेरा,नगरसेवक
सुनील व्यवहारे,नगरसेवक अमोल लोमटे,नगरसेवक वाजेद खतीब,सुनिल वाघाळकर,राणा चव्हाण,रणजित पवार,विजय रापतवार,दिनेश घोडके,अकबर पठाण,अनिस पठाण,सुशील जोशी,महेश वेदपाठक,शेख इस्माईल इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.या दोन दिवसीय शिबिरात 61 जणांनी रक्तदान केले.तर शिबिराच्या यशस्वितेसाठी डॉ.केदार कुटे,डॉ. श्रीमती बर्गे मॅडम,डॉ.शशिकांत पारखे,डॉ.नितीन कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली रक्तपेढीच्या कर्मचा-यांचे सहकार्य लाभले.रक्तदात्यांना वेळ ठरवून दिल्याने रक्तदान शिबीराच्या ठिकाणी गर्दी झाली नाही.आयोजकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करीत सुरक्षित अंतर ठेवून रक्तदान करण्यात आले.

*341 जणांचे उत्स्फूर्त रक्तदान-राजकिशोर मोदी*
===================
सामाजिक बांधिलकी जोपासत आरोग्य सेवेला मदत व सहकार्य करण्याच्या विधायक हेतूने
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने तसेच राज्याचे महसुल मंञी तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात आणि आरोग्यमंत्री ना.राजेशजी टोपे यांनी आपल्या सर्वांना आवाहन केल्यामुळे बीड जिल्हा काँग्रेसने 3 एप्रिल,10 एप्रिल,14 एप्रिल,1 मे,11 मे,20,28 आणि 29 ऑगस्ट 2020 रोजी असे 7 वेळा आयोजित शिबीरात आज तारखेपर्यंत एकूण 341 जणांनी रक्तदान केले आहे.दोन दिवसीय शिबीरात एकूण 61 जणांनी रक्तदान केले.त्या सर्व रक्तदात्यांचे आभार.पुढील काळात रूग्णालयाच्या आवश्यकतेनुसार आणि टप्प्याटप्प्याने असे सर्व मिळून एकूण 500 काँग्रेस कार्यकर्ते रक्तदान करणार आहेत अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी यावेळी दिली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Previous post पंचनाम्याचे आदेश धडकूनही... नुकसानीचे पंचनामे रखडले ,सरसगट पंचनामे होणार नाही
Next post मिरवणूकीस प्रतिबंध असल्याने अंबाजोगाई नगरपरिषदेमार्फत होणार गणेश विसर्जन – नगराध्यक्षा,उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांची माहिती