अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

मिरवणूकीस प्रतिबंध असल्याने अंबाजोगाई नगरपरिषदेमार्फत होणार गणेश विसर्जन – नगराध्यक्षा,उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांची माहिती

आवाहन :- गणेशभक्तांनी उपलब्ध वाहनात गणेश विसर्जन करून सहकार्य करावे

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― अंबाजोगाई शहरातील सर्व गणेशभक्तांना कळविण्यात येते की,कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.याचाच एक भाग म्हणून नागरीकांनी मंगळवार,दिनांक 1 सप्टेंबर रोजी गणेशमुर्तींचे विसर्जन करताना पुढील सूचनांचे पालन करावे.रस्त्यावर व विसर्जनाची ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी.याकरीता ज्यांनी घरगुती गणेशमुर्तींची स्थापना केली असेल अशा गणेशभक्तांनी घराच्या बाहेर न पडता घरीच श्री.गणेशाची आरती करून आपल्याकडील
गणेशमुर्ती या नगरपरिषद अंबाजोगाईने उपलब्ध करून दिलेल्या वाहनात विसर्जनासाठी द्याव्यात सदरचे वाहन प्रत्येक प्रभागात फिरणार आहे.तरी
कोणीही नागरीकांनी विसर्जनाच्या ठिकाणी जावू नये.तसेच सार्वजनिक गणेश मंडळांनी आणि गणेशभक्तांनी शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करून गणेशमुर्ती विसर्जनाकामी प्रशासनास सहकार्य करावे अशी विनंती व आवाहन नगराध्यक्षा सौ.रचना सुरेश मोदी, उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे,सर्व पक्षीय गटनेते,सर्व नगरसेवक आणि मुख्याधिकारी यांनी केले आहे.

अंबाजोगाई नगरपरिषदेच्या वतीने गणेश विसर्जनासाठी करण्यात आलेल्या आवाहनानूसार कोविड-19 चा शहरात प्रार्दुभाव होवू नये यासाठी व गणेश विर्सजन मिरवणुकीस प्रतिबंध असल्याने अंबाजोगाई नगरपरिषदेमार्फत मंगळवार,दिनांक 01/09/2020 रोजी घरगुती व मंडळाचे गणेशमुर्तीचे विसर्जन होणार आहे.विसर्जन व्यवस्थेसाठी पुढील कर्मचारी यांची विसर्जन व्यवस्था सुरळीत होण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.झोन नं-1 प्रमुखाचे नाव - शेख ईफ्तेखार (मो.नं.-7722017413) भागाचे नाव-शिवाजी चौक ते चनई रोड,गुरूवार पेठ - मुकुंदराज रोड, (प्रभाग क्रमांक 9,10,11 व 12) यामध्ये नियुक्त कर्मचारी इशरत मोमीन (मो.नं.-9169341313), मंगेश भंडारे (मो.-8788157340) गोविंद उपाध्याय (मो.नं.-9823715238),खंडू वाघमारे (मो.नं.-9527032826),शेख जमील (मो.नं.-7722017460),शेख अकबर मो.नं.-9657790517),झोन नं-2 प्रमुखाचे नाव 1) शेख ईफ्तेखार (मो.नं. -7722017413) भागाचे नाव-शिवाजी चौक -यशवंतराव चव्हाण - स्वातंत्र्यसैनिक कॉलनी ते शिवाजी चौक,(प्रभाग क्रमांक 13 व 14) यामध्ये नियुक्त कर्मचारी संजय सातपूते (मो.नं.-9421271175),जयद्रथ रोडे (मो.नं.-9022820500),किशन मस्के (मो.नं.-9623876870) शेख इरफान (मो.नं.-9529251629), झोन नंबर-3 प्रमुखाचे नाव-सुनिल वसमतकर (मो.नं.-8975766371)भागाचे नाव-अनुराग कॉलनी ते शिवाजी चौक ते यशवंतराव चव्हाण चौक ते रिंग रोड,(प्रभाग क्रमांक 6 व 8) यामध्ये नियुक्त कर्मचारी दामु चव्हाण (मो.नं. -7722017430) भरत लखेरा (मो.नं.-7722017457) नारायण होके (मो.नं.-8308378865),झोन नंबर-4 प्रमुखाचे नाव-सुनिल वसमतकर (मो.नं.-8975766371) भागाचे नाव-योगेश्‍वरी शिक्षण संस्था ते शिवाजी चौक - शिवाजी चौक ते योगेश्‍वरी देवी मंदिर - बोरूळा तलाव,प्रभाग क्रमांक 1,2,3,4,5 व 7 यामध्ये नियुक्त कर्मचारी-नंदकिशोर कावारे (मो.नं.-7722017423) केरबा वेडे (मो.नं.-7722017426),धनंजय चव्हाण (मो.नं.-7722017428),विकास जोगदंड (मो.नं.-7722090031),गणेशभक्तांनी सदर प्रभागातील नियुक्त झोनप्रमुख व कर्मचा-यांशी गणेश विसर्जनासाठी संपर्क साधावयाचा आहे.तसेच सदर कर्मचारी हे त्या-त्या प्रभागातील श्री.गणेश मुर्तींचे आणि स्वच्छता कर्मचारी हे निर्माल्य याचे संकलन करतील यासाठी तयार करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षात-ए.जे.चव्हाण (मो.नं.-7722017402),उदय दिक्षीत (मो.नं.-7722017411),दिलीप तांबारे (मो.नं.-7722017431),रमाकांत सोनकांबळे (मो.नं.-7722017422),सुनिल गुप्ता (मो.नं.-9850581304),तसेच विसर्जन व्यवस्था समन्वय अधिकारी नगररचनाकार अ.वि.कस्तुरे (मो.नं.-8446633561),बोरुळा तलाव येथे संपुर्ण विसर्जन व्यवस्था अग्निशामकसह करणे व निर्माल्य कलश ठेवणे यासाठी प्रमुख म्हणुन अरूण कुरे (मो.नं.-7722017443),आकाश सानप - विद्युत विभाग (मो.नं.-9028568854),कपील कसबे -अग्निशमन विभाग - (मो-नं.-9403190009) आणि श्री.गणेशमुर्ती विसर्जनासाठी मल्हारी जोगदंड (मो.नं.-7972087252) यांचा समावेश असून तशी जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.अशी माहिती अंबाजोगाई नगरपरिषदेच्या वतीने देण्यात आली आहे.गणेशभक्तांनी त्यांच्याकडील गणेशमुर्तींचे विसर्जन करण्यासाठी संबंधितांशी संपर्क साधून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.


बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.