सोयगाव तालुक्यात परिवहनच्या बसेस कडे प्रवाशांनी पाठ फिरविली ,तीन बस फेऱ्या बंद

Last Updated by संपादक

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― जिल्ह्याअंतर्गत परिवहनच्या बसेस सुरु होवून आठवड्याच्यावर कालावधी उलटूनही अद्यापही सोयगाव आगाराच्या बसेसला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने तोट्यात सुरु असलेल्या बसेस बंद करण्याची वेळ सोयगाव आगरावर आल्याने सोयगाव आगाराने सोयगाव-चाळीसगाव-मालेगाव,सोयगाव-मोहाडी-जळगाव आणि औरंगाबाद अशा तीन बससेवा बंद केल्या आहे.

सोयगाव आगाराने जिल्ह्याअंतर्गत सात फेऱ्या सुरु केल्या होत्या,त्यापैकी चाळीसगाव-मालेगाव आणि जळगाव,औरंगाबाद या तीन बस फेऱ्या तोट्यात सुरु असल्याने तत्काळ बंद करण्यात आल्या आहे.प्रवाशांनी परिवहनचं बसेसकडे पाठ फिरविली आहे.त्यामुळे बहुतांश चांगला प्रतिसाद मिळणाऱ्या बसफेऱ्या सोयगाव आगाराकडून सुरु असून या बसेसला हि इंधन खर्च मिळण्याइतपत उतपन्न मिळत असल्याचे आगार प्रमुख हिरालाल ठाकरे यांनी सांगितले.

सोयगाव-बनोटी रस्त्यावर बसेस बंद-

प्रवाशांनी पाठ फिरविल्याने तोट्यात चालू असलेल्या बसेस सोयगाव आगाराने बंद केल्याने सोयगाव-बनोटी रस्त्यावर बस फेऱ्या बंद झाल्या आहे.त्यामुळे या रस्त्यावर पुन्हा शांतता पसरली आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.